Breaking News

वायू व ध्वनी प्रदूषणाबाबत नियमांचे उल्लंघन...

वायू व ध्वनी प्रदूषणाबाबत नियमांचे उल्लंघन...

पनवेल महापालिकेतर्फे कारवाई;

३४ बांधकाम प्रकल्पांना स्थगिती!

पनवेल (वार्ताहर) - मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार तसेच पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी दिलेल्या निर्देशानुसार पनवेल महापालिका हद्दीतील बांधकाम प्रकल्पांवर वायू प्रदूषण, ध्वनी प्रटूषण व पर्यावरणीय नियमांच्या उल्लंघनाबाबत व्यापक तपासणी करून कारवाई करण्यात आली. स्थळपाहणी अहवालानुसार एकूण ३४ बांधकामस्थळांवर कठोर कारवाई करण्यात आली असून सदर प्रकल्पांचे काम तात्काळ थांबविण्यात आले आहे. यापूर्वी महापालिकेच्या वतीने एकूण १६९ बांधकाम प्रकल्पांना, स्थळांना उपाययोजना करण्याबाबत अथवा काम बंद करण्याबाबाबत इशारावजा जाहीर नोटीस देण्यात आलेली होती. संबंधित बांधकाम व्यावसायिकांना नोटीसा बजावण्यात आल्यानंतरही काही व्यवसायिकांनी अपेक्षित कार्यवाही न केल्याचे दिसून आले. त्यानंतर महानगरपालिकेच्या पथकाने पुन्हा एकदा प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून नियमांचे पालन होत आहे की नाही, याची तपासणी केली. तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी धूळ नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना न करणे, बांधकाम साहित्य खुले ठेवणे, बांधकामाच्या ठिकाणी प्रटूषण करणाऱ्या साहित्यावर नियमाप्रमाने पाणी न शिंपडणे, वाहन स्वच्छता न करणे, तसेच ब्लास्टिंग करतानाच्या मानक कार्यपद्धतीचे पालन न करणे आदी गंभीर बाबी निदर्शनास आल्या. या अनुषंगाने कळंबोली विभाग-१० बांधकाम प्रकल्प, कामोठे विभाग-९ बांधकाम प्रकल्प, नवीन पनवेल/पनवेल विभाग १५ बांधकाम प्रकल्प अशा एकूण ३४ बांधकाम प्रकल्पांवर कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाईदरम्यान संबंधितांना तात्काळ सुधारात्मक उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन सुरूच राहिल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.


Most Popular News of this Week

बेलापूर येथील प्रस्तावीत...

खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...

शासकीय वनजमीनीचा वन...

वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...

लॉजिस्टिक पार्क नोडमधील...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...

कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...

नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...

परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...

ठाणे मनपाच्या पहिल्याच...

शिवसेनेविरोधात उपमहापौरांसह भाजप नगरसेविका आक्रमकठाणे (प्रतिनिधी) - ठाणे...