शासकीय वनजमीनीचा वन मंत्र्यांकडून स्वस्तात वापर!
वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोप
वाशी (प्रतिनिधी) - राज्याच्या मंत्रिमंडळात असणारे वनमंत्री गणेश नाईक यांच्या मुरबाड येथील शेतीला लागून असलेली १५ एकर शासकीय वनजमीन अवघ्या ५०० रुपये प्रति एकर वार्षिक भाडे करार पद्धतीने वापरण्यात येत असल्याचा आरोप रिपब्लिकन मराठा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब मिरजे यांनी वाशीत नुकत्याच आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. यासंदर्भात आपण वनखात्याकडे तक्रार दिली असून त्यावर दखल न घेतल्यास आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेप्रसंगी माहिती देतांना बाळासाहेब मिरजे म्हणाले की, सदर जमीनीमध्ये वन आहे व वनमंत्री जर ही जमीन वापरत असतील तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. याबाबत मी जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे, वनमंत्री कार्यालय मंत्रालय, तसेच वनरक्षक कार्यालय मुलुंड आदीठिकाणी पत्र व्यवहार केला असल्याचे नमूद केले. यापैकी एक पत्राचे उत्तर वनरक्षक कार्यालयाकडून आपणास मिळाले असून त्यात चौकशी करण्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र सदरची चौकशी अत्यंत संथगतीने होत असल्याचे बाळासाहेब मिरजे यांनी यावेळी सांगितले. मुरबाड येथील गट क्रं.४२६, ३९७, ४२८, ४२८ अ, ४३० ,४३१ व ३३ क्रमांकाच्या साध्या सातबाऱ्यावर स्वत: वनमंत्री गणेश नाईक हे भोगवटादार असल्याचा उल्लेख आहे. तर दुसऱ्या गट क्रं.४३१,४७५, ४७५ अ व ४३१ अ वरील जागा अवघ्या ५०० रूपये प्रति एकर या कवडीमोल दराने ६० वर्षासाठी सुबोध अंग्रो या कंपनीला लीजवर दिली आहे व सातबाराधारक स्वत: वनमंत्री नाईक असून या प्रकरणात चौकशी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
आरोप निराधार, सर्व प्रक्रिया कायदेशीर व नियमानुसारच!
दरम्यान, मुरबाड येथील जमीनीसंदर्भात बाळासाहेब मिरजे यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात नामदार गणेश नाईक यांच्यावतीने प्रतिक्रिया व्यक्त करतांना अँड अजित मोरे यांनी सांगितले की, संबंधितांनी केलेले सर्व आरोप हे निराधार व भ्रामक आहेत. जमीनीसंदर्भातील सर्व प्रक्रिया कायदेशीर मार्गाने व नियमांना अधिन राहून आहेत. सर्व आरोप धांदांत खोटे असून त्यामागील बोलविता धनी कोण याबाबतची माहिती आम्हास आहे. एकूणच सर्व आरोपासंदर्भात कायदेशीर मार्गाने कारवाई करण्यास सुरुवात केली असून आरोप करणाऱ्याविरोधात लवकरच अब्रू नूकसानीचा खटला दाखल करण्यात येणार आहे.
Most Popular News of this Week
बेलापूर येथील प्रस्तावीत...
खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...
शासकीय वनजमीनीचा वन...
वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...
लॉजिस्टिक पार्क नोडमधील...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...
परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...
कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...
नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...
ठाणे मनपा सभागृहनेतेपदी...
महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केली घोषणाठाणे (वार्ताहर)- ठाणे...
