Breaking News

रायगडमध्ये काँग्रेस पक्ष किंग मेकरच्या भूमिकेत!

रायगडमध्ये काँग्रेस पक्ष किंग मेकरच्या भूमिकेत!

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे प्रतिपादन

उरण (वार्ताहर) - दिबांच्या जन्मभूमीत जासई येथे काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मंगळवारी आले होते. यावेळी दिबांना आणि हुतात्म्यांना प्रांतांमध्ये हर्षवर्धन सपकाळ आणि कांग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत आणि महाविकास आघाडीचे उमेदवार यांनी अभिवादन केले. या अभिवादनानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी काढलेल्या रॅलीला तुफान प्रतिसाद मिळाला. यावेळी प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, रायगडमध्ये काँग्रेस पक्ष किंग मेकरच्या भूमिकेत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांच्या नावासाठी कांग्रेस पक्ष सुरुवातीपासून आग्रही आहे. केंद्र आणि राज्य सरकार उदासीन आहे, पण दिबांचे नाव दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमधील उत्साह वाखाणण्याजोगा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार बहुमतांनी निवडून येतील असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी महेंद्र घरत म्हणाले, जासई उरण तालुका ही दिबांची जन्मभूमी आहे. दिबांची कामगिरी देशपातळीवर अभिमानास्पद आहे. अद्याप नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव दिलेले नाही, येथील भूमिपुत्र हे कधीच सहन करणार नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भूमिपुत्रांनी विजयी करून सरकारचा निषेध करावा, तेव्हा कुठे सरकार जागे होईल. जासई, चिरनेर हे आमचे बालेकिल्ले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचीच सत्ता येईल. असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. जासई जिल्हा परिषद मतदार संघात डॉ. मनीष पाटील, चिरनेरमधून अँड अविनाश ठाकूर हे काँग्रेसचे उमेदवार उभे आहेत. जासई निर्मला घरत, चिर्ले प्रियंका मढवी, पंचायत समिती उमेदवार कविता पाटील, प्रारंभी गावंड हे सर्व उमेदवार महाविकास आघाडी म्हणून लढत आहेत. जासई, दिघोडे, कोप्रोली येथील प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाविकास आघाडीचेच उमेदवार बहुमतांनी निवडून येतील, असा विश्वास सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला. 

यावेळी कांग्रेसचे सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, श्रद्धा ठाकूर, प्रभारी डॉमनिक डिमेलो, माजी जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत, उरणच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष भावना घाणेकर, उरण तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, श्रुती म्हात्रे, उपाध्यक्ष रामनाथ पंडित, जयवंत पाटील, संजय ठाकूर, प्रेमनाथ म्हात्रे, महिला अध्यक्षा रेखा घरत, शेकापचे नरेश घरत, संतोष म्हात्रे, रवी घरत, बबन कांबळे आदी महाविकास आघाडीचे मान्यवर उपस्थित होते.


Most Popular News of this Week

विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका...

मनसे नगरसेवक अभिजीत देसाईचे आयुक्तांना साकडेबेलापूर (वार्ताहर) - प्रभाग...

तुर्भेगावात एक गाव एक होळी...

तुर्भे (वार्ताहर) - तुर्भेगवात एक गाव होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला....

अर्थसंकल्पीय विशेष सभेला...

उरण नगराध्यक्षांची विशेष अधिकाराचा वापर करून सभागृहात ९८ कोटींच्या...

कळंबोलीतील अनधिकृत...

नोटीसा लावून बेवारस वाहने जप्तपनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका आयुक्त...

कचरा व्यवस्थापन नियमांचे...

कल्याण (वार्ताहर) - कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...

आ.मंदा म्हात्रे यांच्या...

बेलापूर (वार्ताहर) - आ.मंदा म्हात्रे यांनी असंख्य महिलांसह होळी व...