पनवेल महापालिकेतील सेवा निवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवर आक्षेप
पनवेल महापालिकेतील सेवा निवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवर आक्षेप
प्रहार जनशक्ती पक्षाची आयुक्तांकडे कारवाईची मागणी
नवी मुंबई (प्रतिनिधी) - राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे शासकीय, निमशासकीय सेवानिवृत्त अधिकारांच्या सेवा करार पद्धतीने विविक्षित कामासाठी घेण्यासाठी शासन निर्णय स्वयंस्पष्ट असताना, पनवेल पालिकेच्या आस्थापना विभागाने नियमबाह्य पद्धतीने सेवा निवृत्त अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करत शासन निर्णयाचे उल्लंघन केल्याचे दिसून येत असल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाने केला आहे. यासंदर्भात प्रहार जनशक्ती रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुनील शिरीषकर यांच्या नेतृत्वाखाली प्रहारच्या एका शिष्टमंडळाने पनवेल मनपा आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेवून या प्रकरणास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याची मागणी केल आहे.
यासंदर्भात आयुक्तांना सादर केलेल्या निवेदनात प्रहारचे म्हणणे आहे की, नियम क्र. ७ मध्ये नमूद आहे की, एकूण कालावधी तीन वर्षापेक्षा अधिक असणार नाही व नियम क्र. ९ उप नियम ४ नुसार गट - क व गट - ३ संवर्गातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना करार पद्धतीने नियुक्ती देण्यात येवू नये असे शासन आदेश असताना पनवेल पालिकेच्या आस्थापना विभागाने सर्व नियम व कायदे धाब्यावर बसवून ४० पेक्षा जास्त नियमबाह्य पद्धतीने सेवा निवृत्त अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक केल्याचे बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे. ही अत्यंत गंभीर अशी बाब असून, या बाबीची दखल घेत प्रहारचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुनील शिरीषकर व इतर पदाधिकारी यांनी पनवेल मनपा आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेत सेवा निवृत्त नेमणूक घोटाळ्याची चौकशी मागणी करून संबधित जबाबदार असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर शिस्तभंगासह निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आस्थापना विभागाने नियमबाह्य पद्धतीने नेमणूक केलेल्या सर्व सेवा निवृत्त अधिकारी व कर्मचारी यांची सेवा तात्काळ समाप्त करणे, सेवा निवृत्त अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतनापोटी अदा करण्यात आलेले पगार हे संबधित जबाबदार असलेल्या अधिकारी यांच्याकडून वसूल करावे अशा इतरही मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. यावेळी प्रहारच्या शिष्टमंडळामध्ये अँड. मनोज टेकाडे, राज्य प्रवक्ते, अँड. अजय तापकीर, संपर्क अध्यक्ष रायगड, अजय कदम, राहुल तेलंग आदी पदाधिकारी उपस्थित होते.
आस्थापना विभागाने सेवा निवृत्त अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतनापोटी व इतर भत्त्यांकरिता लाखों रुपयांची उधळपट्टी करत जनतेच्या पैशांचा अपव्यय केला आहे. या प्रकारास जबाबदार असलेल्या आस्थापना विभागाची सखोल चौकशी करून उचित नियमानुसार कारवाई करणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास येत्या काळात प्रहार स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुनील शिरीषकर यांनी दिला आहे.
Most Popular News of this Week
बेलापूर येथील प्रस्तावीत...
खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...
लॉजिस्टिक पार्क नोडमधील...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...
शासकीय वनजमीनीचा वन...
वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...
कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...
नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...
परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...
सारसोळेगावातील अनधिकृत...
नेरुळ (वार्ताहर)- नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या...
