Breaking News

लॉजिस्टिक पार्क नोडमधील अनधिकृत बांधकामांवर सिडकोची तोडक कारवाई

लॉजिस्टिक पार्क नोडमधील अनधिकृत बांधकामांवर सिडकोची तोडक कारवाई

नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या काही दिवसांपासून सिडको संपादित व जागेवरील अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा सपाटा लावला आहे. त्यानुसार काल लॉजिस्टिक पार्क नोडमधील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई करून ती हटविली. सिडकोच्या अनधिकृत बांधकामे (न.मुं) विभागामार्फत दि.२३ फेब्रुवारी रोजी लॉजिस्टिक पार्क नोड येथे केलेल्या या कारवाईत मौजे गावठाण सर्वे नंबर १६ येथे निष्कासन मोहिम राबवून सिडको अधिसूचित, संपादित जागेवरील अंदाजे क्षेत्रफळ ११०८५.०० चौ. मीटर जागेवरील पार्किंग, पत्रा शेड, सिक्युरीटी केबिन इत्यादी स्वरूपाचे अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने तोडले. उपरोक्त अतिक्रमण सिडकोच्या प्रचलित नियमावली व धोरणांचा भंग करुन व सिडको महामंडळाकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी न घेता उभारण्याले असल्यामुळे ते निष्कासित करण्यात आल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे. सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मंगडे यांच्या निर्देशानुसार व मुख्य नियंत्रक, अनधिकृत बांधकामे (नवी मुंबई) यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको अतिक्रमण विभागाचे अधिकारी, स्थानिक पोलिस अधिकारी व सिडको पोलीस पथक, महावितरण विभागाचे अधिकारी, सिडको सुरक्षा रक्षक आणि महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक यांच्या सहभागाने यशस्वीपणे राबविण्यात आली. या कारवाईसाठी ५ लेबर, प्रत्येकी १ जेसीबी, १ ट्रक, २ जीप, असा लवाजमा तैनात ठेवण्यात आला होता.


Most Popular News of this Week

नवी मुंबईतील सत्ताधारी...

नवी मुंबई (प्रतिनिधी) – राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे ओएसडी...

परिवहन समितीच्या सभेत...

एनएमएमटीच्या करारावरील चालक, वाहकांच्या पगारात भरघोस वाढड्रायव्हर,...

सीबीडीत मसाजच्या नावाखाली...

सात पिडित महिलांची सुटका; मॅनेजर महिलेस पोलिस कोठडी - नवी मुंबई (प्रतिनिधी)...

महापौर, उपमहापौरांसमवेत माजी...

नवी मुंबईतील विविध विषयासंदर्भात चर्चा; विकासाचा वेग वृद्धिंगत...

महापालिकेला फसविणाऱ्या...

अर्थसंकल्पीय चर्चेत शिवसेना नगरसेवक शिवराम पाटीलांची मागणी नवी मुंबई...

लॉजिस्टिक पार्क नोड येथील...

नवी मुंबई (प्रतिनिधी) – सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागातर्फे...