कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी मुंबई महापौर श्री
नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्मान
नवी मुंबई (प्रतिनिधी)- राज्यभरातील शरीरसौष्ठवपटूंमध्ये अत्यंत लोकप्रिय असणाऱ्या “नवी मुंबई महापौर श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा' आणि “नमुंमपा क्षेत्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धा” विष्णुदास भावे नाटयगृहात अत्यंत जल्लोषात संपन्न झाल्या. या स्पर्धत कोल्हापूरचा अजिक्य रेडकर याने नवी मुंबई महापौर श्री हा राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचा विजेता होण्याचा बहुमान प्राप्त केला. तर नवी मुंबईतील नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्मान पुरस्कार मिळाला. राज्यभरातील विविध जिल्हयातून आलेल्या विविध वजनी गटाच्या १२८ शरीरसौष्ठवपटूंमधून कोल्हापूरच्या अजिक्य रेडकर यांनी सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करीत दीड लाख बक्षिस रक्कमेसह “नवी मुंबई महापौर श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठवपटू २०२५-२६ किताबासह मानाचा नवी मुंबई महापौर श्री चषक स्विकारला. सोलापूरच्या पंचाक्षरी लोणार यांनी ५० हजार पारितोषिक रक्कमेसह राज्यस्तरीय उपविजेतेपद पटकाविले.
“नवी मुंबई महापालिका क्षेत्र श्री २०२५ - २६' या नवी मुंबई महानगरपालिका स्तरीय स्पर्धेत सहभागी ७१ स्पर्धकांमधून सर्वोत्कृष्ट शरीरसौष्ठवपटूचे नमुंमपा क्षेत्र विजेतेपद ७0 हजार पारितोषिक रक्कम व मानाच्या चषकासहीत नेरूळच्या निरंत पाटील यांनी पटकाविले. नेरूळच्या अक्षय पाटील यांनी नवी मुंबई महापालिका क्षेत्र श्री स्पर्धेचे उपविजेतेपद ३८ हजार रक्कमेसह संपादन केले. राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धत मोहम्मद जमाल, ठाणे यांनी “मोस्ट इम्प्रुव्हड बॉडी बिल्डर' किताब तसेच स्वप्निल सकपाळ, रायगड यांनी “बेस्ट पोझर' किताब पटकाविला. या दोघानांही प्रत्येकी रु. १५ हजार रक्कमेची पारितोषिके प्रशस्तीपत्रासह प्रदान करण्यात आली. एकूण १९९ शरीरसौष्ठवपटूंच्या उत्साही सहभागातून यशस्वी झालेल्या या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचा शुभारंभ नवी मुंबईच्या महापौर सुजाता सुरज पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी बोलताना महापौर सुजाता पाटील यांनी व्यायामाचा आणि आरोग्याचा अत्यंत निकटचा संबंध असल्याने शहरातील युवकांनी व्यायामाकडे वळावे जेणेकरून आपोआप ते व्यसनापासून टूर जातील व शहर सुदृढ व निरोगी होईल असे मत व्यक्त केले. तसेच यापुढील काळात अधिकाधिक स्पर्धक यामध्ये सहभागी होतील असा महापालिकेचा प्रयत्न राहील असे त्यांनी नमूद केले.
राज्यभरातून आलेल्या शरीरसौष्ठवपटूंचे स्वागत केले. महापौर सुजाता पाटील यांच्याहस्ते नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र श्री पुरस्कार वितरण करण्यात आले. समारोपप्रसंगी राज्यस्तरीय महापौर श्री शरीरसौष्ठव स्पर्धेचे पारितोषिक वितरण करताना उपमहापौर दशरथ भगत यांनी नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा क्षेत्रात उदयोन्मुख गुणवंत खेळाडू घडविण्यासाठी विविध उपक्रम राबवित असल्याची माहिती दिली. शरीरसौष्ठव संघटनेचे पदाधिकारी तथा माजी खासदार संजीव नाईक यांनी १९९६ पासून सातत्याने यशस्वीपणे आयोजित केल्या जात असलेल्या या स्पर्धेचे आकर्षण संपूर्ण राज्यातील शरीरसौष्ठवपटूंना असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. स्पर्धा शुभारंभप्रसंगी महापौर सुजाता सुरज पाटील, क्रीडा विभागाच्या उपायुक्त अभिलाषा म्हात्रे - पाटील, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे, महाराष्ट्र राज्य शरीरसौष्ठव संघटनेचे सेक्रेटरी राजेंद्र चव्हाण, उपाध्यक्ष गोपाळ गायकवाड, पदाधिकारी शरद मारणे व अजय गोळे, नवी मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष जी.एस. पाटील व सेक्रेटरी हेमंत खेबडे, विनय मोरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
नवी मुंबई महापौर श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा ५५, ६०, ६५, ७०, ७५, ८०, ८५ किलोपर्यंत व ८५ किलोवरील अशा ८ वजनी गटांमध्ये तर नवी मुंबई महापालिका क्षेत्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धा ५०, ५५, ६०, ६५, ७० किलोपर्यंत व ७० किलोवरील अशा ६ वजनी गटांमध्ये आयोजित केली होती. या प्रत्येक वजनी गटातील अनुक्रमे ६ व ५ विजेत्यांना रोख पारितोषिकांसह प्रशस्तीपत्रे प्रदान करण्यात आली. सायं. ५ वाजल्यापासून रात्री १२.१५ वाजेपर्यंत विष्णुदास भावे नाटयगृहात शरीरसौष्ठवपटूंचा व त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आलेल्या क्रीडारसिकांचा जल्लोश होता.
Most Popular News of this Week
बेलापूर येथील प्रस्तावीत...
खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...
शासकीय वनजमीनीचा वन...
वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...
लॉजिस्टिक पार्क नोडमधील...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...
कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...
नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...
परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...
ठाणे मनपा सभागृहनेतेपदी...
महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केली घोषणाठाणे (वार्ताहर)- ठाणे...
