उरणमध्ये शिंदे गटात मोठा भूकंप, पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे!
उरणमध्ये शिंदे गटात मोठा भूकंप, पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे!
उरण - राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे, त्यामुळे राजकीय पक्षांची तयारी जोरात सुरू आहे. अशातच आता एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. रायगड जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेत नाराजी उफाळून आली आहे.
उरण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेतील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिल्याने राजकीय वातावरण तापले आहे. आमदार महेंद्र थोरवे यांच्या मनमानी आणि एकतर्फी कारभाराला कंटाळून हा निर्णय घेतल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता प्रभारी जिल्हाप्रमुखांची नियु्ती करण्यात आल्याने शिवसैनिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. उरण तालुका प्रमुख दीपक ठाकूर आणि पनवेल तालुका प्रमुख रघुनाथ पाटील यांनीही आपले राजीनामे वरिष्ठांकडे सुपूर्त केले आहेत.
शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्या मनमानी आणि एकतर्फी कारभाराला कंटाळून हा निर्णय घेतल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता प्रभारी जिल्हाप्रमुखांची नियु्ती करण्यात आल्याने पदाधिकारी नाराज होते. तसेच पक्षवाढीसाठी मेहनत करणाऱ्या जिल्हाप्रमुख अतुल भगत यांना पदावरून दूर केल्याने ही नाराजी अधिक वाढली होती. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. उरण तालुका प्रमुख दीपक ठाकूर आणि पनवेल तालुका प्रमुख रघुनाथ पाटील यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी ही आपले राजीनामे शिवसेना सचिव संजय मोरे यांच्याकडे सोपवले आहेत. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेला मोठा फटका बसणार आहे. आता हे पदाधिकारी कोणत्या पक्षात प्रवेश करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शिवसेनेचे महानगर प्रमुख संजय गुजराती यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबईत हा पक्षप्रवेश पार पडला. संजय गुजराती यांच्यासह शिवसेनेचे माजी नगरसेवक चंद्रशेखर दुसाने यांनीदेखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
Most Popular News of this Week
तुर्भेगावात एक गाव एक होळी...
तुर्भे (वार्ताहर) - तुर्भेगवात एक गाव होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला....
अर्थसंकल्पीय विशेष सभेला...
उरण नगराध्यक्षांची विशेष अधिकाराचा वापर करून सभागृहात ९८ कोटींच्या...
विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका...
मनसे नगरसेवक अभिजीत देसाईचे आयुक्तांना साकडेबेलापूर (वार्ताहर) - प्रभाग...
कळंबोलीतील अनधिकृत...
नोटीसा लावून बेवारस वाहने जप्तपनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका आयुक्त...
कचरा व्यवस्थापन नियमांचे...
कल्याण (वार्ताहर) - कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...
आ.मंदा म्हात्रे यांच्या...
बेलापूर (वार्ताहर) - आ.मंदा म्हात्रे यांनी असंख्य महिलांसह होळी व...
