महापालिका निवडणुकीच्या पार्थभूमीवर उत्पादन शुल्क, परिवहन व वाहतूक विभागाची बैठक संपन्न
महापालिका निवडणुकीच्या पार्थभूमीवर उत्पादन शुल्क, परिवहन व वाहतूक विभागाची बैठक संपन्न
आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या पनवेल मनपा आयुक्तांच्या सुचना
पनवेल (वार्ताहर)- पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्थभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अनुषंगाने निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष व शांततेत पार पडावी यासाठी काल दि. २६ डिसेंबर रोजी महापालिका मुख्यालयात उत्पादन शुल्क, परिवहन विभाग व वाहतूक विभागाची बैठक निवडणूक अधिकारी तथा आयुक्त मंगेश चितळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत आयुक्त मंगेश चितळे यांनी, पनवेल मनपा निवडणूकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सुचना संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना केल्या. या बैठकित तीनही विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. आदर्श आचारसंहिताचे पालन करताना निवडणूक रॅली, प्रचार मिरवणुकीदरम्यान वाहनांना ना हरकत प्रमाणपत्र देण्याविषयीच्या सूचना परिवहन विभागास देण्यात आल्या. प्रचार रॅलीचे मार्गाविषयी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी चर्चा करून माहिती करून घेणे, वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी करणे, तपासणी नाक्यावरती संशयास्पद वाहनांची चौकशी करण्याबाबत या बैठकीत सूचना देण्यात दिल्या. उत्पादन शुल्क विभागास भरारी पथकांच्या साह्याने चेकपोस्ट नाक्यांवरती बनावट दारू, अवैध वस्तू यांच्यावर कारवाई करण्याबाबत तसेच पथकांच्या साह्याने आदर्श आचारसंहिताचे पालन करताना विविध तक्रारींचे तात्काळ निवारण करण्याविषयी सूचना दिल्या. तसेच प्रभाग निहाय भरारी पथकाच्या माध्यमातून कारवाई करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
पोलीस वाहतूक विभागास सूचना देताना सहा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाजवळील वाहतूक कोंडीची ठिकाणे शोधून वाहतूक कोंडी होणार नाही यादृष्टीने बॅरिकेटिंग करणे, पार्किंगचे नियोजन करण्याविषयक सूचना दिल्या. सर्व विभागांच्या नोडल अधिकाऱ्यांना एकमेकांच्या संपर्कात राहून नियोजनपूर्वक काम करावे तसेच एक खिडकी योजनेबाबत माहिती देताना शासनाच्या संबंधित विभागाच्या प्रत्येकी एका प्रतिनिधीने प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत सूचना दिल्या. निवडणूकविषयक सर्व कामे एक खिडकीच्या माध्यमातून देण्याविषयीच्या सूचना या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. पनवेल महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, अतिरिक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे, निवडणूक विभागाचे उपायुक्त नानासाहेब कामठे यांनी यावेळी उपस्थित संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन व सूचना दिल्या.
Most Popular News of this Week
बेलापूर येथील प्रस्तावीत...
खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...
लॉजिस्टिक पार्क नोडमधील...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...
शासकीय वनजमीनीचा वन...
वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...
कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...
नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...
परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...
सारसोळेगावातील अनधिकृत...
नेरुळ (वार्ताहर)- नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या...
