Breaking News

न्हावा शेवा पाणीपुरवठा टप्पा -३ वेळेत पूर्ण करा !

न्हावा शेवा पाणीपुरवठा टप्पा -३ वेळेत पूर्ण करा !

आ.प्रशांत ठाकूर यांचे प्रशासनाला निर्देश पनवेल (प्रतिनिधी) – पनवेल महापालिकेत शुक्रवारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत न्हावा शेवा पाणीपुरवठा योजना टप्पा-३ संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा सक्षम करणे अत्यावश्यक असल्याने ही योजना प्राधान्याने आणि वेळेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिकाऱ्यांना दिले. या आढावा बैठकीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी महापालिका प्रशासनासोबत न्हावा शेवा टप्पा - ३ पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा सविस्तर आढावा घेतला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून (एमजेपी) सुरू असलेल्या या योजनेचे काम तांत्रिक अडचणींमुळे लांबणीवर पडले आहे. एप्रिल किंवा जूनअखेरपर्यंत पूर्ण होणारी ही योजना आता जुलैअखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पाईपलाइन टाकताना काही ठिकाणी जागा मालकांशी असलेले वाद तसेच तांत्रिक अडथळे ही प्रमुख कारणे असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. या पार्श्वभूमीवर नगरसेवकांवर जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले असून, पाइपलाइन टाकण्याच्या कामात येणाऱ्या अडचणी तात्काळ सोडविण्यावर भर देण्यात येत आहे. यावेळी आ.प्रशांत ठाकूर यांनी नगरसेवकांना आपल्या प्रभागातील नागरिकांशी थेट संवाद साधण्याचे आवाहन केले. या बैठकीस महापौर नितीन पाटील, आयुक्त मंगेश चितळे, उपमहापौर प्रमिला पाटील, माजी सभागृह नेते तथा नगरसेवक परेश ठाकूर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता प्रशांत भामरे, कार्यकारी अभियंता वेंगुर्लेकर, उपअभियंता रमेश वायदंडे, सभागृह नेते प्रकाश बिनेदार, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, महिला व बालकल्याण सभापती ममता म्हात्रे तसेच नगरसेवक प्रवीण पाटील, अजय बहिरा, सुमित झुंजारराव, रुचिता लोंढे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


Most Popular News of this Week

नवी मुंबईतील सत्ताधारी...

नवी मुंबई (प्रतिनिधी) – राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे ओएसडी...

परिवहन समितीच्या सभेत...

एनएमएमटीच्या करारावरील चालक, वाहकांच्या पगारात भरघोस वाढड्रायव्हर,...

सीबीडीत मसाजच्या नावाखाली...

सात पिडित महिलांची सुटका; मॅनेजर महिलेस पोलिस कोठडी - नवी मुंबई (प्रतिनिधी)...

महापौर, उपमहापौरांसमवेत माजी...

नवी मुंबईतील विविध विषयासंदर्भात चर्चा; विकासाचा वेग वृद्धिंगत...

लॉजिस्टिक पार्क नोड येथील...

नवी मुंबई (प्रतिनिधी) – सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागातर्फे...

नवी मुंबईतील प्रलंबीत...

प्रस्तावित सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल प्रकल्पास गती देण्याचे...