डॉ. आदर्श पाटील यांच्या ‘ऑर्थोपेडिक क्लिनिक’चे सानपाड्यात दिमाखात उद्घाटन; मान्यवरांची मांदियाळी
डॉ. आदर्श पाटील यांच्या ‘ऑर्थोपेडिक क्लिनिक’चे सानपाड्यात दिमाखात उद्घाटन; मान्यवरांची मांदियाळी
नवी मुंबई :- सानपाडा सेक्टर-१ येथे प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. आदर्श पाटील यांच्या नूतन ऑर्थोपेडिक क्लिनिकचा भव्य उद्घाटन सोहळा काल मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक, पत्रकारिता आणि वैद्यकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांनी उपस्थित राहून डॉ. आदर्श पाटील यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या उद्घाटन सोहळ्याला राज्याचे वनमंत्री व पालकमंत्री गणेश नाईक, आमदार मंदाताई म्हात्रे, नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत, नगरसेविका माधुरी सुतार शैला पाटील, शुभांगी पाटील शशिकला पाटील,नगरसेवक सूरज पाटील, नगरसेविका शिल्पा ठाकूर, माजी मनपा विरोधी पक्षनेते नामदेव भगत,ठाणे जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष राहुल पिंगळे,सामाजिक कार्यकर्ते सुधीर दाणी, सुभाष हांडे देशमुख परशुराम ठाकूर, गणेश कमळे, मराठी अभिनेता अशोक पालवे,डॉ. रविन्द्र इंगळे,डॉ. उसनाळे, डॉ. भूषण जैन,डॉ, सांगळे, डॉ श्रीमंत जगताप माजी जिल्हाधिकारी सुनील शेळके, माजी उपआयुक्त दत्तात्रय नागरे, चंद्रकांत तायडे विविध क्षेत्रातील समाजसेवक, डॉक्टर्स, वरिष्ठ अधिकारी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक व रहिवाशांनीही या सोहळ्याला हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
‘नावाप्रमाणेच क्लिनिक आदर्श ठरेल’ – मान्यवरांचे प्रतिपादन
उद्घाटनप्रसंगी बोलताना पालकमंत्री गणेश नाईक, आमदार मंदाताई म्हात्रे आणि महापौर सुजाता पाटील यांनी डॉ. आदर्श पाटील यांच्या वैद्यकीय कौशल्याचे कौतुक केले. "ज्येष्ठ पत्रकार दिनेश पाटील यांचे सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील कार्य नेहमीच लोकाभिमुख राहिले आहे. डॉ. आदर्श पाटील देखील त्यांचा हाच समाजसेवेचा वारसा पुढे चालवतील. नावाप्रमाणेच हे क्लिनिक एक 'आदर्श' म्हणून रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. हाडांच्या व सांध्यांच्या आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना या ठिकाणी उत्तम आणि खात्रीशीर उपचार मिळून नक्कीच आराम पडेल," अशा भावना मान्यवरांनी आपल्या शुभेच्छांमधून व्यक्त केल्या.
आधुनिक उपचार आणि रुग्णसेवा हेच
ध्येय – डॉ. आदर्श पाटील
उपस्थितांचे आभार मानताना आणि आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. आदर्श पाटील म्हणाले, "आजवर मी अनेक नामांकित आणि मोठ्या रुग्णालयांमध्ये ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून कार्यरत होतो. तिथे काम करण्याचा मोठा अनुभव गाठीशी आहे. आता सानपाड्यात हे स्वतःचे स्वतंत्र युनिट (क्लिनिक) सुरू करताना मला आनंद होत आहे. मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटल्समध्ये ज्या दर्जाच्या आरोग्य सेवा आणि आधुनिक उपचार मिळतात, अगदी तशाच प्रकारच्या अद्ययावत सेवा या क्लिनिकच्या माध्यमातून सर्वसामान्य रुग्णांना देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील." सानपाडा आणि परिसरातील नागरिकांसाठी हे ऑर्थोपेडिक क्लिनिक वरदान ठरणार असून, हाडांच्या व सांध्यांच्या सर्व विकारांवर आता एकाच छताखाली तज्ज्ञ उपचार उपलब्ध झाले आहेत.
