पनवेलनजीक २ भटक्या ध्वानांचा विषप्रयोगाने मृत्यू!
अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल
पनवेल (वार्ताहर) - अज्ञात व्यक्तीने पनवेल तालुक्यातील नेरे परिसरात वावरणाऱ्या दोन निष्पाप भटक्या श्वानांवर विषप्रयोग करुन त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पनवेल तालुका पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात प्राण्यांना क्रूरतेने वागवल्याबद्दल गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे. या घटनेमुळे नेरे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, प्राणीमित्रांनी या कृत्याचा तीव्र निषेध केला आहे. नेरे गावाजवळ असलेल्या कृष्णा किराणा दुकानाच्या परिसरात दोन भटक्या श्वानांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे आढळुन आले. या भ्वानांना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक विषबाधा होईल असे पदार्थ खाऊ घातल्याचा संशय स्थानिक नागरिकांमधुन व्यक्त केला जात आहे. सदर घटनेनंतर नेरे येथील रहिवासी अनुराधा पासी (३६) यांनी हिंमत दाखवत पोलिसांत धाव घेतली. तसेच आपल्या परिसरातील मुक्या प्राण्यांवर झालेला हा अन्याय पाहून त्यांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवली. पनवेल तालुका पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. तसेच अज्ञात व्यक्तीविरोधात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, १९६० च्या कलम ११(१) (आय) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच या घटनेतील दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे संकेत पोलिसांनी दिले आहेत.
Most Popular News of this Week
बेलापूर येथील प्रस्तावीत...
खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...
शासकीय वनजमीनीचा वन...
वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...
लॉजिस्टिक पार्क नोडमधील...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...
परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...
कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...
नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...
ठाणे मनपा सभागृहनेतेपदी...
महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केली घोषणाठाणे (वार्ताहर)- ठाणे...
