हवा प्रदूषण करणाऱ्या ३८ विकासकांना पनवेल मनपातर्फे काम बंद ठेवण्याचे आदेश!
हवा प्रदूषण करणाऱ्या ३८ विकासकांना पनवेल मनपातर्फे काम बंद ठेवण्याचे आदेश!
पनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका क्षेत्रात इमारत बांधकाम विकास प्रकल्पांमुळे होणारी हवा प्रटूषण पातळी कमी करण्याबाबत महाराष्ट्र शासन शासनाने पारित केलेल्या १५ प्रकारच्या मार्गदर्शक सुरक्षा उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी न करणाऱ्या आणि बांधकामाच्या ठिकाणी सेन्सॉर आधारित वायु प्रदूषण मॉनिटर न लावणाऱ्या पनवेल महापालिका क्षेत्रातील एकूण ९२ विकासकांना काम बंदची नोटिस पालिकेकडून बजावण्यासह हवा प्रटूषणनियमांची पूर्तता न करणाऱ्या ३८ विकासकांना पुढील आदेश येईपर्यंत महापालिकेकडून स्थगिती आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, प्रहार जनशक्ती आणि अन्याय अत्याचार निर्मूलन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेळ शहरातील नागरी समस्या व प्रशासनातील घोटाळयाबाबत पालिकेला देण्यात आलेल्या निवेदनावर महापालिकेने ठोस अशी कारवाई न केल्यामुळे पालिका मुख्यालयावर ठ्य्या आंदोलन करण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षातर्फे काही दिवसांपूर्वी देण्यात आला होता. या निवेदनात शासनाने पारित केलेल्या १५ प्रकारच्या मार्गदर्शक सुरक्षा उपाययोजनांची काटेकोरपणे अमलबजावणी न करणाऱ्या बांधकाम विकासकांबाबतही मुद्दा उपस्थित करण्यासह याबाबत पाठपुरावा सुरु ठेवण्यात आला होता. अखेरीस प्रहार जनशक्ती पक्षाच्या या पाठपुराव्यास यश आले असून,शासनाने पारित केलेल्या १५ प्रकारच्या मार्गदर्शक सुरक्षा उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी न करणाऱ्या आणि बांधकामाच्या ठिकाणी सेन्सॉर आधारित वायु प्रदूषण मॉनिटर स्थापित न लावणाऱ्या पनवेल महापालिका क्षेत्रातील एकूण ९२ विकासकांना काम बंदची नोटिस पालिकेकडून बजावण्यात आली आहे. ज्यात हवा प्रटूषणनियमांची पूर्तता न करणाऱ्या ३८ विकासकांना पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती आदेश महापालिकेकडून देण्यात आले असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुनील शिरीषकर यांनी दिली आहे. दरम्यान, हवा प्रटूषणमुळे पनवेल शहरातील नागरिकांना याचा फटका बसत असताना व आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत असताना पालिका आयुक्त याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप होता, त्यामुळे नागरिकांना आरोग्यविषयक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारीवरुन या करिता प्रहार पक्षाच्यावतीने निवेदनाव्दारे आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता असे सुनील शिरीषकर यांनी सांगितले.
Most Popular News of this Week
बेलापूर येथील प्रस्तावीत...
खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...
लॉजिस्टिक पार्क नोडमधील...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...
शासकीय वनजमीनीचा वन...
वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...
कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...
नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...
परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...
सारसोळेगावातील अनधिकृत...
नेरुळ (वार्ताहर)- नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या...
