Breaking News

महिलांचे सोन्याचे दागिने जबरीने खेचणारे त्रिकुट अटकेत

महिलांचे सोन्याचे दागिने जबरीने खेचणारे त्रिकुट अटकेत

४ गुन्हे उघडकीस; ९ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त

पनवेल (वार्ताहर) - महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरीने खेचणाऱ्या तिघा अट्टल चोरटयांना गुन्हे शाखा कक्ष ३, पनवेल यांनी अटक करून या त्रिकुटाकडून ४ गुन्हे छडकीस आणले आहेत. मोहम्मद शफिक हनिफ शाह (२८), विवेक विश्वनाथ सोनार (२५) व आदर्श हरिसिंग दर्जी (२५) अशी अटक केलेल्या तिघा आरोपींची नावे आहेत.  नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हद्दीमध्ये काही अनोळखी इसम हे दुचाकीवरून भरधाव वेगाने येवून महिलांच्या गळयातील सोन्याचे किंमती व मौल्यवान दागिने जबरीने खेचुन जबरी चोरी करत असल्याबाबत अनेक गुन्हे दाखल आहेत. अशा गंभीर गुन्हयांची तात्काळ उकल करण्याबाबत पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह. पोलीस आयुक्त संजय येनपुरे व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिसांना सुचना दिलेल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखा कक्ष ३, पनवेल पोलीस पथकाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये घडलेल्या गुन्हयांची माहिती प्राप्त करण्यासह घटनास्थळाचे आजुबाजुचे प्राप्त सीसीटिव्ही फुटेजची सखोल तपासणी केली तसेच तांत्रिक तपास करुन पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत दाखल गुन्हयामध्ये उपरोक्त ३ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींना अटक केल्यांनतर तिघांकडे कौशल्यपुर्ण तपास करुन ९ लाख ९३ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील २, कामोठे आणि खारघर पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण ४ गुन्हे उघडकीस आणत, सदर गुन्हयातील जबरी चोरी झालेला १0० टक्के मुद्देमाल हस्तगत केला आहे. गुन्हेशाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त अजयकुमार लांडगे यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि अविनाश काळदाते, एपीआय पवन नांद्रे, पीएसआय अभयसिंह शिंदे, माधव इंगळे, सफो अनिल पाटील, पोलिस हवालदार रमेश शिंदे, प्रमोद राजपुत, प्रशांत काटकर, अजित पाटील, निलेश पाटील व इतर आदींच्या पथकाने सदरची ही कामगिरी पार पाडली आहे.


Most Popular News of this Week

विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका...

मनसे नगरसेवक अभिजीत देसाईचे आयुक्तांना साकडेबेलापूर (वार्ताहर) - प्रभाग...

तुर्भेगावात एक गाव एक होळी...

तुर्भे (वार्ताहर) - तुर्भेगवात एक गाव होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला....

अर्थसंकल्पीय विशेष सभेला...

उरण नगराध्यक्षांची विशेष अधिकाराचा वापर करून सभागृहात ९८ कोटींच्या...

कळंबोलीतील अनधिकृत...

नोटीसा लावून बेवारस वाहने जप्तपनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका आयुक्त...

कचरा व्यवस्थापन नियमांचे...

कल्याण (वार्ताहर) - कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...

आ.मंदा म्हात्रे यांच्या...

बेलापूर (वार्ताहर) - आ.मंदा म्हात्रे यांनी असंख्य महिलांसह होळी व...