पनवेल मनपा निवडणुकीत तब्बल १६ वकील रिंगणात
पनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत कायद्याची पदवी घेतलेले आणि प्रत्यक्ष वकिली व्यवसाय करणारे तब्बल १६ वकिल उमेदवार विविध प्रभागांतून निवडणूक रिंगणात उत्तरले आहेत. त्यामुळे भविष्यात पनवेल महापालिकेत कायदेशीर जाण असलेल्या लोक प्रतिनिधींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली ग्राह्य जात आहे. यंदाच्या निवडणुकीतील सर्वाधिक लक्षवेधी प्रभाग म्हणजे प्रभाग क्र.१७. येथे अँड. मनोज भुजबळ, माजी नगराध्यक्ष सुनील घरत यांच्या कन्या अँड.शिवानी घरत, भाजपकडून अँड. प्रकाश बिनेदार तसेच कपबशी चिन्हावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे अँड. जयसिंग शेरे यांचा समावेश असून हे चारही वकील थेट आमनेसामने आहेत. कामोठे प्रभाग क्र १२ मध्ये शेकापतर्फे अँड. सिद्धार्थ सोनाजी इंगळे (शिट्टी चिन्ह) यांनी भाजपचे उमेदवार प्रभाकर कांबळे यांना थेट आव्हान दिले आहे. याच प्रभागात अँड सुलक्षणा जगदाळे अपक्ष म्हणून मैदानात उतरल्या आहेत. त्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या महिला महानगर संघटनेत सक्रिय होत्या; मात्र उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष लढत देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रभाग क्रमांक ६ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग या जागेवर भाजपकडून माजी नगरसेवक अँड. नरेश ठाकूर निवडणूक लढवत आहे. याच प्रभागात सर्वसाधारण महिला गटातून अँड. गीता सुशील चौधरी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. प्रभाग क्र.७ मध्ये जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अनिता पाटील व ज्येष्ठ नेते आत्माराम पाटील यांच्या कन्या अँड. विणा पाटील मैदानात आहेत तसेच प्रभाग क्र ८ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांचे पुत्र अँड. तुषार पाटील तुतारी चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. याशिवाय प्रभाग क्रमांक ९ मधून भाजपच्या अँड. प्रतिभा सुभाष भोईर, प्रभाग ११ मधून अँड. समाधान काशीद, प्रभाग १३ मधून अपक्ष अँड. संतोष गाडी, तसेच प्रभाग १८ व १९ मधून अनुक्रमे अँड. सिद्धार्थ गावकर आणि अँड. राहुल कासारे हे उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, यंदा मतदार केवळ पक्षनिष्ठा न पाहता उमेदवाराची अभ्यासू मांडणी, प्रश्नांची समज, प्रशासनावरची पकड आणि कायदेशीर स्पष्टता या बाबींनाही महत्त्व देत आहेत. प्रचारात मांडले जाणारे मुद्दे आणि विकासाच्या ठोस योजना मतदारांवर कितपत प्रभाव टाकतात, याचा फैसला दि.१६ जानेवारी रोजी निकालाच्या रूपाने समोर येणार आहे.
Most Popular News of this Week
तुर्भेगावात एक गाव एक होळी...
तुर्भे (वार्ताहर) - तुर्भेगवात एक गाव होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला....
अर्थसंकल्पीय विशेष सभेला...
उरण नगराध्यक्षांची विशेष अधिकाराचा वापर करून सभागृहात ९८ कोटींच्या...
विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका...
मनसे नगरसेवक अभिजीत देसाईचे आयुक्तांना साकडेबेलापूर (वार्ताहर) - प्रभाग...
कळंबोलीतील अनधिकृत...
नोटीसा लावून बेवारस वाहने जप्तपनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका आयुक्त...
कचरा व्यवस्थापन नियमांचे...
कल्याण (वार्ताहर) - कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...
आ.मंदा म्हात्रे यांच्या...
बेलापूर (वार्ताहर) - आ.मंदा म्हात्रे यांनी असंख्य महिलांसह होळी व...
