गोवा राज्य निर्मित विदेशी मद्य तस्करीवर कारवाई
विक्रेत्यासह मद्याचा माल घेणारा अटकेत
पनवेल (वार्ताहर) - राज्य उत्पादन शुल्क पनवेल शहर विभाग यांनी गोवा राज्य निर्मित विदेशी मद्य तस्करीवर धडक कारवाई करून ६६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी मद्याची विक्री करणारा आरोपी निखिल तामघाडे याच्यासह त्याच्याकडून माल घेणारा पंकज नेमोडे अशा दोघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत हकीकत अशी की, दि. २४ डिसेंबर रोजी निखिल अशोक तामघाडे हा इसम मड्याव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल तेजस एक्सप्रेसने गोवा राज्य निर्मित आणि विक्रीसाठी असलेल्या दारुने भरलेली बॅग घेऊन विक्रीच्या उद्देशाने उतरणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क पनवेल यांना मिळाली होती. या माहितीनुसार पथकाने सापळा रचला. मात्र आरोपीला चाहूल लागल्याने त्याने ती बॅग प्लॅटफॉर्मवर टाकली आणि रेल्वेमध्ये पुन्हा चढून रेल्वे बरोबर पुढे निघून गेला. यावेळी विभागाद्रारे जलद पद्धतीने व्युव्हग्चना आखण्यात आली आणि योग्य नियोजन करून ठाणे रेल्वे स्टेशन येथे माल घेण्यासाठी आलेला आरोपी पंकज नीलकंठ नेमोडे यास अटक केली. नंतर मुख्य आरोपी निखिल याला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई येथे अटक करण्यात आली आहे. या कारवाईतून ६६ हजार ३२५ रुपये किंमतीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. सदरची कारवाई निरीक्षक भानुदास फणसेकर, दुय्यम निरीक्षक योगेंद्र लोळे, कृष्णा देवरे, योगेश पाडाळे, अजित बडदे, सुरज बुधवाले, क्रषिकेश भोगे यांच्या पथकाने केली.
Most Popular News of this Week
तुर्भेगावात एक गाव एक होळी...
तुर्भे (वार्ताहर) - तुर्भेगवात एक गाव होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला....
अर्थसंकल्पीय विशेष सभेला...
उरण नगराध्यक्षांची विशेष अधिकाराचा वापर करून सभागृहात ९८ कोटींच्या...
विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका...
मनसे नगरसेवक अभिजीत देसाईचे आयुक्तांना साकडेबेलापूर (वार्ताहर) - प्रभाग...
कळंबोलीतील अनधिकृत...
नोटीसा लावून बेवारस वाहने जप्तपनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका आयुक्त...
कचरा व्यवस्थापन नियमांचे...
कल्याण (वार्ताहर) - कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...
आ.मंदा म्हात्रे यांच्या...
बेलापूर (वार्ताहर) - आ.मंदा म्हात्रे यांनी असंख्य महिलांसह होळी व...
