Breaking News

ऐतिहासिक वर्ल्ड कप विजयाबद्दल महिला अंध क्रिकेट संघाचा सन्मान

ऐतिहासिक वर्ल्ड कप विजयाबद्दल महिला अंध क्रिकेट संघाचा सन्मान

पनवेल (प्रतिनिधी) इंडसइंड बँकेने महिला अंध टी-२० क्रिकेट वर्ल्ड कपच्या पहिल्या आवृत्तीत ऐतिहासिक विजय मिळवलेल्या भारतीय महिला अंध क्रिकेट संघाचा सन्मान करण्यासाठी विशेष सत्कार समारंभाचे आयोजन केले.इंडसइंड बँक, क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडिया या समर्थनम ट्रस्ट फॉर द डिसेबल्डच्या उपक्रम व क्रिकेट विभागाच्या सहकार्याने, आपल्या सीएसआर उपक्रमांतर्गत भारतीय अंध क्रिकेट संघासह ७०० हून अधिक अंध क्रिकेटपटूंना सातत्याने पाठबळ देत आहे.या सत्कार समारंभात संघाच्या ऐतिहासिक यशाचा गौरव करण्यात आला.
      यावेळी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव आनंद, क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडियाचे अध्यक्ष व समर्थनम ट्रस्ट फॉर द डिसेबल्डचे संस्थापक व व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. महंतेश किवडसन्नावर तसेच बँकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या ऐतिहासिक कामगिरीच्या गौरवार्थ इंडसइंड बँकेकडून संघाला रोख बक्षीस प्रदान करण्यात आले.या प्रसंगी बोलताना इंडसइंड बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव आनंद म्हणाले,“भारतीय महिला अंध क्रिकेट संघाने मिळवलेला हा ऐतिहासिक वर्ल्ड कप विजय भारतातील समावेशक क्रीडाक्षेत्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. या उल्लेखनीय यशाचा भाग असल्याचा आम्हाला अभिमान आहे. क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडिया सोबतच्या आमच्या भागीदारीद्वारे, व्यक्तींना सक्षम बनवणारे आणि आत्मविश्वासाने नेतृत्व करण्यास प्रेरित करणारे एक मजबूत, समावेशक परिसंस्था निर्माण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडियाचे अध्यक्ष व समर्थनम ट्रस्ट फॉर द डिसेबल्डचे संस्थापक व व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. महंतेश किवडसन्नावर म्हणाले, इंडसइंड बँक आपल्या ‘इंडसइंड बँक क्रिकेट फॉर ब्लाइंड’ या सीएसआर उपक्रमांतर्गत भारतीय अंध क्रिकेट संघाला पाठबळ देते. क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडियाच्या सहकार्याने राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमामध्ये प्रशिक्षण, पोषणविषयक मार्गदर्शन, समुपदेशन, क्रीडा साहित्य, आर्थिक मदत, सामन्यांदरम्यान निवास व्यवस्था तसेच दृष्टिहीन खेळाडूंकरिता क्रीडाविषयक जनजागृती कार्यक्रमांचा समावेश आहे. या उपक्रमांमुळे जिल्हा व राज्य स्तरावरील खेळाडूंना विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवणे शक्य झाले आहे.


Most Popular News of this Week

तुर्भेगावात एक गाव एक होळी...

तुर्भे (वार्ताहर) - तुर्भेगवात एक गाव होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला....

अर्थसंकल्पीय विशेष सभेला...

उरण नगराध्यक्षांची विशेष अधिकाराचा वापर करून सभागृहात ९८ कोटींच्या...

विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका...

मनसे नगरसेवक अभिजीत देसाईचे आयुक्तांना साकडेबेलापूर (वार्ताहर) - प्रभाग...

कळंबोलीतील अनधिकृत...

नोटीसा लावून बेवारस वाहने जप्तपनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका आयुक्त...

कचरा व्यवस्थापन नियमांचे...

कल्याण (वार्ताहर) - कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...

आ.मंदा म्हात्रे यांच्या...

बेलापूर (वार्ताहर) - आ.मंदा म्हात्रे यांनी असंख्य महिलांसह होळी व...