पनवेल मनपा हद्दीतील ३८ बस थांब्यासाठी दहा कोटींहून अधिकचा खर्च!
पनवेल मनपा हद्दीतील ३८ बस थांब्यासाठी दहा कोटींहून अधिकचा खर्च!
पनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका हद्दीत बांधलेल्या ३८ बस थांब्यांचा खर्च दहा कोटीहून अधिक असल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे. एका बस थांब्याचा खर्च २६ ते २७ लाख रुपये असल्याने सारे अचंबित झाले आहेत. दरम्यान, बस थांब्यावर एवढा खर्च करण्याऐवजी महापालिकेने स्वतःची परिवहन बस सेवा सुरू करायला हवी होती अशा प्रतिक्रिया यासंदर्भात आता जाणकारांकडून ऐकावयास मिळत आहे. पनवेल महापालिका हद्दीत एकूण ३८ बस थांबे विकसित करण्यात आले आहेत. हे बस थांबे विकसित करण्याचे कार्यादेश बोरकर पॉलिमर्स यांना देण्यात आले असून प्रति बस थांबा २२ लाख ८९ हजार रुपये (जीएसटी वगळून) एवढा खर्च येत आहे. जीएसटी पकडून जवळपास २६ ते २७ लाख रुपये एका बस थांब्याचा खर्च अपेक्षीत आहे. पनवेल महानगरपालिकेची स्थापना होऊन आजमितीस ९ वर्ष उलटून गेले आहेत. मात्र तरी देखील पनवेल पालिकेची स्वतःची बस सेवा अस्तित्वात नाही. तब्बल दहा कोटी रुपये खर्च करून फक्त ३८ बस थांबे पालिका हद्दीत उभारण्यात आले. या ऐवजी पनवेल महापालिकेने स्वतःची परिवहन सेवा सुरू करणे गरजेचे होते. मात्र तसे न करता बस थांब्यावर दहा कोटी रुपये खर्च करण्यात आला. पनवेल पालिकेकडून यासाठी शासकीय निधी प्राप्त झाला होता असे सांगण्यात आले. मात्र हा शासकीय निधी इतर ठिकाणी देखील वापरता आला असता. मात्र ३८ बस थांब्यावर त्यांची उधळपट्टी करण्यात आली. बस थांबे जरी आकर्षक दिसत असले तरी देखील ते खराब होण्याचीच भीती जास्त आहे. पनवेल महापालिकेने जीएसटीसह दहा कोटी सत्तावीस लाख रुपये खर्च करून पालिका हद्दीत अडतीस बस थांबे उभारले. मात्र स्वतःची परिवहन सेवा पालिकेला सुरू करता आली नाही. हे पालिकेचे अपयश असून, पालिकेकडून नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी सुरू असल्याचा आरोप यासंदर्भात बोलतांना राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश युवक (शप) चे आदित्य जानोरकर यांनी केला आहे. तर पनवेल महानगरपालिका हद्दीत चांगल्या दर्जाचे बस स्टॅन्ड तयार झाले आहेत. त्यासाठी शासकीय निधी प्राप्त झालेला असल्याचे उपायुक्त वैभव विधाते यांनी सांगितले.
Most Popular News of this Week
बेलापूर येथील प्रस्तावीत...
खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...
लॉजिस्टिक पार्क नोडमधील...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...
शासकीय वनजमीनीचा वन...
वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...
कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...
नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...
परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...
सारसोळेगावातील अनधिकृत...
नेरुळ (वार्ताहर)- नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या...
