Breaking News

पनवेल महापालिकेच्या यादीत नवी मुंबईतील मतदारांचा ढिग!

पनवेल महापालिकेच्या यादीत नवी मुंबईतील मतदारांचा ढिग!

मतदार यादीत तब्बल १२१४३ दुबार नावे

दुबार नावे हटविण्याची शिवसेनेची पालिकेकडे मागणी

पनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या तोंडावर एक अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीत थेट १२,१४३ दुबार आणि संशयित मतदारांची नावे घुसल्याचा खळबळजनक दावा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी केला आहे.  सदर नावे जिल्ह्याबाहेरील, म्हणजेच नवी मुंबईतील बेलापूर आणि ऐरोली विधानसभा मतदारसंघातील असल्यामुळे, आगामी निवडणुकीच्या निष्पक्षतेवरच मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्त, प्राधिकृत अधिकारी (मतदार यादी) यांना तातडीने निवेदन देऊन या “महागोंधळा*वर कारवाईची मागणी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्थानिक मतदारच असणे कायद्याने बंधनकारक असताना, पनवेल मनपाच्या यादीत नवी मुंबईतील मतदारांचा ढिग आढळला आहे. बेलापूर मतदारसंघ (विधानसभा १५१) ते पनवेल मनपा यादीत ६,१३८ दुबार/संशयित नावे तर ऐरोली मतदारसंघ (विधानसभा १९०) ते पनवेल मनपा यादीत ६,००५ दुबार/संशयित नावे असून या संशयित मतदारांची संख्या एकूण १२,१४३ इतकी आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, विधानसभा मतदार याद्यांची प्रभाग निहाय फोड करून स्थानिक निवडणुकांची यादी तयार केली जाते. मात्र,पनवेल मनपाच्या यादीत जिल्ह्याबाहेरील मतदार घुसल्याने मतदानाच्या वैधतेवरच थेट आक्षेप घेण्यात आला आहे. जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी याबाबत मागणी केली आहे की, या १२,१४३ दुबार मतदारांची कठोर शाहनिशा करावी आणि अंतिम यादीत त्यांच्या नावांसमोर विशिष्ट चिन्हांकन करण्यासह मतदाराचे मतदान एकाच केंद्रात होण्यासाठी नियोजन करण्याची विनंती त्यांनी आयुक्तांना केली आहे. जर या त्रुटी वेळीच सुधारल्या नाहीत, तर संपूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेवर आणि निकालावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

“बोगस" मतदारांच्या जीवावर निकाल फिरवले जाण्याची भीती

प्रारूप यादीवर हरकती घेण्याची अंतिम मुदत दि.३ डिसेंबर २०२५ होती. यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीतही मोठ्या प्रमाणावर दुबार नावे आढळली होती, पण त्यावेळी कोणतीही कठोर कारवाई झाली नव्हती. त्यामुळे यंदा याच बोगस” मतदारांच्या जीवावर निवडणुकीचे निकाल फिरवले जाण्याची भीती व्यक्त होत आहे.



Most Popular News of this Week

तुर्भेगावात एक गाव एक होळी...

तुर्भे (वार्ताहर) - तुर्भेगवात एक गाव होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला....

अर्थसंकल्पीय विशेष सभेला...

उरण नगराध्यक्षांची विशेष अधिकाराचा वापर करून सभागृहात ९८ कोटींच्या...

विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका...

मनसे नगरसेवक अभिजीत देसाईचे आयुक्तांना साकडेबेलापूर (वार्ताहर) - प्रभाग...

कळंबोलीतील अनधिकृत...

नोटीसा लावून बेवारस वाहने जप्तपनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका आयुक्त...

कचरा व्यवस्थापन नियमांचे...

कल्याण (वार्ताहर) - कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...

आ.मंदा म्हात्रे यांच्या...

बेलापूर (वार्ताहर) - आ.मंदा म्हात्रे यांनी असंख्य महिलांसह होळी व...