Breaking News

नवी मुंबईत तब्बळ ४१ उमेदवार दहा हजारी!

नवी मुंबईत तब्बळ ४१ उमेदवार दहा हजारी!

भाजपच्या २७ तर शिवसेना शिंदे गटाच्या १४ उमेदवारांचा समावेश

- नितीन पडवळ -

नवी मुंबई - लोकशाहीतील निवडणुक प्रक्रियेत एक एक मत फार महत्त्वाचं असते. याचे सर्वात महत्वाचे व ऐतिहासिक उदाहरण म्हणजे १९९९ मध्ये संसदेतील अविश्वास ठरावाप्रसंगी झालेल्या मतदानातअवघ्या एका मतांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार पडले होते. त्यामुळे लोकशाहीत एक एक मत हे निवडणूकीच्या रिंगणात उभ्या ठाकलेल्या उमेदवाराचे भवितव्य ठरवत असते. नुकत्याच पार पडलेल्या नवी मुंबई महापालिका निवडणूकीच्या रिंगणातील तब्बळ ४१ उमेदवारांनी दहा हजार किंवा त्यापेक्षा अधिक मते मिळवली आहेत. यात भारतीय जनता पक्षामधील सर्वात जास्त २७ उमेदवारांचा तर त्याखालोखाल शिवसेनेच्या १४ उमेदवारांचा समावेश आहे. नवी मुंबई महापालिका निवडणूकीत दहा हजार किंवा त्यापेक्षा अधिक मते मिळविणाऱ्या शिवसेनेच्या (शिंदे) उमेदवारांमध्ये, प्रभाग क्र .१ ब मधून चांदनी चौगुले यांना १०९३९ मते मिळाली आहेत. प्रभाग १ क मधून जगदीश गवते १०९०२ मते, प्रभाग क्र.२ अ मधून श्वेता काळे यांना १३३०५ मते, प्रभाग क्र.र ब मधून विजय चौगुले यांना १३२४५ इतकी मते तर प्रभाग क्र.२ क मधून गौरी आंग्रे यांना १३३५७ मते, प्रभाग क्र.२ ड मधून शुभम चौगुले यांना १३९१६ मते मिळाली आहेत. प्रभाग क्रं.४ब मधून मनोज हळदणकर यांना १०८०३ मते, प्रभाग क्रं.9 ब मधून मंदाकिनी म्हात्रे यांना १०१६१ मते, प्रभाग ७ ड मधून चैताली पाटील यांना १०३१४ मते, प्रभाग क्र.९ ड मधून सौरभ शिंदे यांना १०९४६ मते, प्रभाग क्र.१५ मधून कविता पाटील यांना १०७४५ मते, प्रभाग २० अ मधून सविता लगाडे यांना १०४४६ मते, प्रभाग २० ब मधून अबोली कुलकर्णी यांना १०१८७ मते, प्रभाग २० क मधून सुरेश कुलकणी यांना १२३१७ मते मिळाली आहेत.

भारतीय जनता पक्षामधील दहा हजार किंवा त्यापेक्षा अधिक मते मिळविणाऱ्या २७ उमेदवारांमध्ये प्रामुख्याने प्रभाग क्र६ ब मधून गंगा पाटील यांना १०५३५ मते, प्रभाग क्र.१० अ मधून संदीप म्हात्रे यांना १२१५३ मते, १० ब मधून सायली शिंदे यांना ११३९७ मते, प्रभाग १० क मधून चंद्रभागा मोरे यांना ११६५६ मते, प्रभाग १० ड मधून राजु मढवी यांना १०६८३ मते, प्रभाग ११ क मधून शिरीष पाटील यांना १०२७६ मते, प्रभाग १३ अ मधून सागर नाईक यांना १००१६ मते, प्रभाग १३ ब मधून आदिती नाईक यांना १०७०८ मते, प्रभाग क्र. १५ अ मधून शुभांगी ज्ञानेश्वर पाटील यांना १२५५४ मते, प्रभाग १५ ब मधून शशिकला भोलानाथ पाटील यांना १०९१७ मते, प्रभाग १५ क मधून कविता पाटील यांना १०७४५ मते, प्रभाग १५ ड मधून रामचंद्र घरत यांना १०८७३ मते, १६ अ मधून शशिकांत राऊत यांना १०५०५ मते, १६ ब मधून अंजनी भोईर यांना ११३४६ मते, १६ क मधून अंजली वाळूंज यांना १३५७६ मते, १६ ड मधून प्रकाश मोरे यांना ११२९३ मते, प्रभाग १८ अ मधून प्रिती भगत यांना १२४७६ मते, १८ ब मधून दयावती शेवाळे यांना ११००२ मते, १८ क मधून दशरथ भगत यांना १११४८ मते, प्रभाग १८ ड मधून निशांत भगत यांना ११३५८ मते, प्रभाग २१ अ मधून माधूरी सुतार यांना १००६८ मते, प्रभाग २३ अ मधून सुजाता सुरज पाटील यांना १२२२० मते, प्रभाग २३ ब मधून रूपाली भगत यांना १०५७१ मते, प्रभाग २३ ड मधून सुरज पाटील यांना १२०५९ मते, २४ अ मधून गिरीश म्हात्रे यांना १२५१२ मते, २४ ब मधून प्रिती भोपी यांना १०९००, प्रभाग २४ क मधून स्वप्ना गावडे १०२०१ व प्रभाग २४ ड मधून सचिन लवटे यांना १००७४ मते मिळाली आहेत.


शुभम चौगुले यांना सर्वाधिक मते

नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत नवी मुंबईत सर्वाधिक मते मिळवून विजयी होण्याचा मान शिवसेनेचे उपनेते विजय चौगुले यांचे सुपुत्र शुभम चौगुले यांना मिळाला आहे. प्रभाग २ ड मधून निवडणूक लढवितांना शुभम चौगुले यांना एकूण १३९१६ इतकी वैध मते मिळाली आहेत. शुभम चौगुलेंनी प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार राज(यल्लू) शिंगे यांचा ७५९२ मतांनी पराभव केला.


Most Popular News of this Week

बेलापूर येथील प्रस्तावीत...

खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...

लॉजिस्टिक पार्क नोडमधील...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...

शासकीय वनजमीनीचा वन...

वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...

कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...

नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...

परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...

ठाणे मनपा सभागृहनेतेपदी...

महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केली घोषणाठाणे (वार्ताहर)- ठाणे...