नवी मुंबईतील लॉजमध्ये फोफावतोय वेश्या व्यवसाय... एपीएमसीत वेश्याव्यवसायातुन २ महिलांची सुटका; तिघांना अटक
नवी मुंबईतील लॉजमध्ये फोफावतोय वेश्या व्यवसाय... एपीएमसीत वेश्याव्यवसायातुन २ महिलांची सुटका; तिघांना अटक
नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबईत लॉजमध्ये चालणाऱ्या वेश्या व्यवसायाचा नवी मुंबई गुन्हेशाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या (अएचटीयु) पथकाकडून पर्दाफाश करण्यावर भर दिला जात आहे. त्यानुसार रबाळे एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीतील महापे येथील हर्षिता नावाच्या लॉजमध्ये बांग्लादेशी महिलांच्या आडून चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर या पथकाने कारवाई करून दोघा पिडित महिलांची सुटका करण्यासह लॉज मालकासह तिघांना अटक करण्याची घटना ताजी असतांनाच, एपीएमसी येथील एका लॉजवर गुन्हेशाखेच्या पथकाने नुकतीच धाड टाकून तेथे चालणारा वेश्या व्यवसायाचा अड्डा उध्दवस्त करून दोन पिडित महिलांची सुटका केली आहे. तर याप्रकरणी मॅनेजरसह तिघांना अटक करण्यात आली आहे. लागोपाठच्या या कारवाई सत्रातून नवी मुंबईत तललॉजमध्ये वेश्या व्यवसाय फोफावला असल्याचे स्पष्ट होत आहे. अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना दि.२० नोव्हेंबर २०२५ रोजी त्याचे गुप्त बातमीदारामार्फत, श्रीनिधी हॉटेल अँण्ड लॉजिंग, प्लॉट नंबर ४५, सेक्टर १९/सी, ए.पी.एम.सी., येथे लॉज मॅनेजर हा वेश्यागमनासाठी मुली व महिला लॉजमध्ये बोलावुन ग्राहकास दाखवतो व ग्राहकाने मुलगी पसंद केल्यानंतर ग्राहकाकडुन वेश्यागमनाचे पाच हजार रूपये स्विकारले जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांच्या मार्गदर्शनाखाली बनावट ग्राहकास श्रीनिधी हॉटेल अ अँण्ड लॉजिंग येथे पाठवले. यावेळी बनावट ग्राहकाच्या सांकेतीक इशाऱ्यावरून पथकाने लॉजवर छापा टाकला असता, त्याठिकाणी 0२ पिडीत महिला वेश्यागमनाकरीता ठेवलेल्या मिळुन आल्या. सदर लॉजचा मॅनेजर मस्तराम रामस्नेही कनोजिया, (२९), रा. सेक्टर ९९, नवछावा बिल्डींग, वाशी, वेटर विशाल अवद यादव, (२३), रा. नमुद लॉज, मुळ रा.झारखंड , लॉज मालक रघु अण्णा (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) व महिला पुरवणारा दलाल सोनु उर्फ शाहिन हुसेन मंडळ, (२८), सध्या रा.रूम नंबर ४०१, सेक्टर 0६, सारसोळे, , मुळ रा. पश्चिम बंगाल यांच्या नमुद २ पिडीत महिला यांना प्राप्त करुन लॉजमध्ये ठेवल्या असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी मॅनेजर मस्तराम रामस्नेही कनोजिया, वेटर विशाल अवद यादव, महिला पुरवणारा दलाल सोनु उर्फ शाहिन हुसेन मंडळ तसेच (४) पाहिजे आरोपी रघु अण्णा यांनी आपसात संगनमत करून २ पिडीत महिलांचा वेश्याव्यवबसायासाठी वापर केल्याचे पोलिसांच्या तपासातून निष्पन्न झाल्याने उपरोक्त सर्वाविरोधात भा.न्या.सं.कलम १४३ (3), ३(५), सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा कलम ३, ४, ५ अन्वये गुन्हा दाखल करून मॅनेजर मस्तराम रामस्नेही कनोजिया, वेटर विशाल अवद यादव व महिला पुरवणारा दलाल सोनु उर्फ शाहिन हुसेन मंडळ अशा तिघांना अटक करण्यात आली असून तिघांना २४ नोव्हेंबरपर्यंतची पोलिस कोठडी न्यायालयाने दिली आहे. लॉजमालक रघु अण्णा याचा शोध ए.पी.एम.सी. पोलीस करत आहे. नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, सह पोलीस आयुक्त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे दीपक साकोरे, गुन्हेशाखेचे पोलीस उपआयुक्त सचिन गुंजाळ यांच्या निर्देशानुसार अएचटीयु पथकाचे सहाय्यक पोलिस आयुक्त धर्मपाल बनसोडे यांचे मार्गदर्शनाखाली वपोनिरी पृथ्वीराज घोरपडे, सपोनि योगेश देशमुख, सपोनि राजश्री शिंदे, पोउपनिरी सरिता गुडे, पोलिस हवालदार मांडोळे, ठाकुर व इतर आदींच्या पथकाने सदरची ही कामगिरी पार पाडली आहे.
Most Popular News of this Week
विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका...
मनसे नगरसेवक अभिजीत देसाईचे आयुक्तांना साकडेबेलापूर (वार्ताहर) - प्रभाग...
तुर्भेगावात एक गाव एक होळी...
तुर्भे (वार्ताहर) - तुर्भेगवात एक गाव होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला....
अर्थसंकल्पीय विशेष सभेला...
उरण नगराध्यक्षांची विशेष अधिकाराचा वापर करून सभागृहात ९८ कोटींच्या...
कळंबोलीतील अनधिकृत...
नोटीसा लावून बेवारस वाहने जप्तपनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका आयुक्त...
कचरा व्यवस्थापन नियमांचे...
कल्याण (वार्ताहर) - कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...
आ.मंदा म्हात्रे यांच्या...
बेलापूर (वार्ताहर) - आ.मंदा म्हात्रे यांनी असंख्य महिलांसह होळी व...
