Breaking News

अनधिकृत अँप व कंपन्यापासून सावध राहण्याचे एनआरआय पोलिसांचे नागरिकांना आवाहन

अनधिकृत अँप व कंपन्यापासून सावध राहण्याचे एनआरआय पोलिसांचे नागरिकांना आवाहन


नवी मुबई (प्रतिनिधी) -आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात कर्ज घेणे सहज आणि सोपे झाले आहे.आजमितीस बहुतांश लोक त्यांची कामे फक्त ईएमआय आणि कर्जाच्या माध्यमातून करतात. याचा फायदा घेत कर्ज देण्याच्या नावाखाली लोन देणाऱ्या अँप्स तुमची फसवणूक करत आहेत. वित्तीय संस्थांसोबतच फिनटेक कंपन्या आता मोबाईल अँप्सवरही तुम्हाला काही मिनिटांत कर्ज मिळवून देतात, मात्र या डिजिटायझेशनमुळे फसवणुकीच्या समस्याही खूप वाढल्या आहेत. विशेषकरून अनधिकृत डिजिटल लेंडिंग अँप व कंपनी यांच्या माध्यमातून मध्यमवर्गीय, सेवानिवृत्त, वयोवृद्ध व विद्यार्थी यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. ही गंभीर बाब लक्षात घेता एमआरआय पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी पोलिस ठाणे हद्दीतील सोसायटीधारक व नागरिकांना असे अनधिकृत अँप व कंपन्यापासून सावध राहण्यासह काही माहिती असल्यास तात्काळ पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. यासंदर्भात एनआरआय पोलिसांनी सर्व सोसायटी पदाधिकारी यांना विनंती केली आहे की, सेबीकडून प्राप्त झालेल्या अनधिकृत डिजिटल लेंडिंग अँप व कंपनी यांच्या माध्यमातून मध्यमवर्गीय, सेवानिवृत्त, वयोवृद्ध व विद्यार्थी यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. त्यामुळे अनधिकृत डिजिटल लेंडिंग अँप व कंपनी यांच्याबाबत काही माहिती असल्यास तात्काळ पोलीस ठाणे येथे माहिती द्यावी. तसेच सदर कंपन्यांमध्ये कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यात येऊ नये. सदर कंपन्याबाबत आपले सोसायटीमधील इतर रहिवासी यांच्यामध्ये जनजागृती करावी असे आवाहन केले आहे. दरम्यान, डिजिटल लेंडिग अँपव्दारे फसवणूकीचे प्रकार करणारे प्रामुख्याने, बहुधा संभाव्य कर्जदाराला आमिष दाखवण्यासाठी सायबर गुन्ह्यात गुंततात. आपण प्रामाणिक आहोत असे दाखवण्यासाठी डिजिटल दस्तऐवज आणि वेब पेज तयार करतात. अशा अँप्स आणि फिनटेक कंपन्या देखील कर्जदाराची दिशाभूल करतात की ते कायदेशीर फिनटेक कंपनीच्यावतीने कार्य करत आहेत. कर्जासाठी अर्ज करताना कर्जदार विविध वैयक्तिक कागदपत्रे कर्ज अँपवर प्रविष्ट करतो.असे अनधिकृत अप्स हे मोबाइल फोनमधील मेसेज, कॉन्टॅक्ट्स, फाइल्स इत्यादी खाजगी फोल्डर्समध्ये प्रवेश घेतात आणि अशा फसव्या अप्समुळे नागरिकांचा डेटा सुरक्षित व खाजगी राहत नाही आणि भविष्यात नागरिकांना फसवणूकीच्या घटनांना सामोरे जावे लागते.


Most Popular News of this Week

विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका...

मनसे नगरसेवक अभिजीत देसाईचे आयुक्तांना साकडेबेलापूर (वार्ताहर) - प्रभाग...

तुर्भेगावात एक गाव एक होळी...

तुर्भे (वार्ताहर) - तुर्भेगवात एक गाव होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला....

अर्थसंकल्पीय विशेष सभेला...

उरण नगराध्यक्षांची विशेष अधिकाराचा वापर करून सभागृहात ९८ कोटींच्या...

कळंबोलीतील अनधिकृत...

नोटीसा लावून बेवारस वाहने जप्तपनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका आयुक्त...

कचरा व्यवस्थापन नियमांचे...

कल्याण (वार्ताहर) - कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...

आ.मंदा म्हात्रे यांच्या...

बेलापूर (वार्ताहर) - आ.मंदा म्हात्रे यांनी असंख्य महिलांसह होळी व...