आचारसंहिता काळात प्रसारमाध्यमांनी प्रेस कॉन्सिलची मार्गदर्शक तत्वे पाळावीत!
आचारसंहिता काळात प्रसारमाध्यमांनी प्रेस कॉन्सिलची मार्गदर्शक तत्वे पाळावीत!
पनवेल मनपा आयुक्त मंगेश चितळेे यांचे आवाहन
पनवेल (वार्ताहर) - निवडणूक आचारसंहिता काळात प्रसारमाध्यमांनी प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियाची मार्गदर्शक तत्वे पाळावीत व त्यानुसार निवडणूक विषयक बातम्यांचे वार्तांकन करावे असे आवाहन पनवेल महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी मंगेश चितळे यांनी प्रसार माध्यमांना केले आहे. राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भात प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियाची मार्गदर्शक तत्वे मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत. ती पुढील प्रमाणे असून त्याचे पालन प्रसार माध्यमांनी अवश्य करावे. मार्गदर्शक तत्वे (१) निवडणुकांबद्दल आणि उमेदवारांबद्दल वस्तुनिष्ठ वृत्तांत देणे हे प्रसारमाध्यमांचे कर्तव्य आहे. निवडणुकांदरम्यान कोणताही उमेदवार /पक्ष किंवा घटनेविषयी सदोष निवडणूक प्रचार, अतिशयोक्तिपूर्ण वार्तांकन यात वृत्तपत्रांनी सहभागी होणे अपेक्षित नाही. प्रत्यक्षात दोन किंवा तीन अतिनिकटचे प्रतिस्पर्धी उमेदवार हे सर्व प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधून घेतात. प्रत्यक्ष प्रचाराचे वार्तांकन करताना एखाद्या वृत्तपत्राने, एखाद्या उमेदवाराने उपस्थित केलेला कोणताही महत्वाचा मुद्दा आणि त्यांच्या किंवा तिच्या प्रतिस्पर्ध्यावर केलेली कडक टिका या बाबी सोडून देऊ नये. (२) निवडणूक नियमान्वये वर्ण अथवा जातीय आधारावर प्रचार करण्यास बंदी आहे, म्हणून प्रसारमाध्यमांनी धर्म, वंश, जात, जमात किंवा भाषा यांच्या आधारावर लोकांमध्ये आपसात शत्रुत्वाची किंवा ट्रेषभावना पसरविण्याचा संभव असणारे वृत्त देणे टाळावे. (३) प्रसारमाध्यमांनी कोणत्याही उमेदवाराचे वैयक्तिक चारित्र्य किंवा वागणूक किंवा कोणत्याही उमेदवाराच्या किंवा त्याच्या उमेदवारीच्या किंवा त्याच्या उमेदवारी परत घेण्याच्या संबंधात निवडणुकांमध्ये त्या उमेदवाराच्या भवितव्याला बाधा पोहचेल, अशा प्रकारच्या खोट्या अथवा गंभीर विधानांना प्रसिद्धी देण्यापासून टूर रहावे. प्रसारमाध्यमांनी कोणताही उमेदवार, पक्ष यांच्याविरुद्धची शहानिशा न केलेले आरोप प्रसिद्ध करु नये. (४) प्रसारमाध्यमांनी एखादा उमेदवार, पक्ष यास पुढे आणण्याकरिता आर्थिक किंवा इतर प्रकारे कोणत्याही तऱ्हेचे प्रलोभन स्वीकारू नये. कोणताही उमेदवार, पक्ष यांच्याकडून अथवा त्यांच्यावतीने देऊ केलेले कोणतेही आतिथ्य किंवा इतर सुविधा यांचा स्वीकार करु नये.(५) प्रसारमाध्यमांनी कोणताही विशिष्ट उमेदवार, पक्ष यांच्या प्रसारास वाव देणे अपेक्षित नाही. तर तसे करावयाचे झाल्यास, इतर उमेदवार, पक्ष यांना त्यावर उत्तर देण्याची मुभा देण्यात यावी.(६) प्रसारमाध्यमांनी एखादा सत्ताधारी पक्ष, शासन यांच्या कामगिरीसंबंधातील सरकारी राज्य कोषातील खर्चाने दिलेली कोणतीही जाहिरात स्वीकारु नये, प्रसिद्ध करु नये. (७) वृत्तपत्रे, राज्य निवडणूक आयोगाने, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी किंवा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी वेळोवेळी काढलेल्या निदेशांचे, आदेशांचे, अनुदेशांचे पालन करतील. तरी या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करून प्रसारमाध्यमांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे.
Most Popular News of this Week
तुर्भेगावात एक गाव एक होळी...
तुर्भे (वार्ताहर) - तुर्भेगवात एक गाव होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला....
अर्थसंकल्पीय विशेष सभेला...
उरण नगराध्यक्षांची विशेष अधिकाराचा वापर करून सभागृहात ९८ कोटींच्या...
विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका...
मनसे नगरसेवक अभिजीत देसाईचे आयुक्तांना साकडेबेलापूर (वार्ताहर) - प्रभाग...
कळंबोलीतील अनधिकृत...
नोटीसा लावून बेवारस वाहने जप्तपनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका आयुक्त...
कचरा व्यवस्थापन नियमांचे...
कल्याण (वार्ताहर) - कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...
आ.मंदा म्हात्रे यांच्या...
बेलापूर (वार्ताहर) - आ.मंदा म्हात्रे यांनी असंख्य महिलांसह होळी व...
