Breaking News

एपीएमसीत खळबळ ! १.४० लाखांची लाच घेताना दोघा अधिकाऱ्यांना अटक

एपीएमसीत खळबळ ! १.४० लाखांची लाच घेताना दोघा अधिकाऱ्यांना अटक

वाशी (वार्ताहर) – नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून लाचखोरीच्या प्रकरणात वाढ झाल्याचे दिसून येत असतांनाच, नवी मुंबई एसीबीच्या युनिटने मुंबई एपीएमसी मार्केट प्रशासनात मोठी कारवाई करत स्वच्छता विभागातील दोन अधिकाऱ्यांना १ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे एपीएमसी प्रशासकीय इमारतीत एकच खळबळ उडाली आहे. पोलिस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही यशस्वी कारवाई केली. मुंबई एपीएमसी प्रशासकीय इमारतीतील स्वच्छता उप सचिव कार्यालयावर नवी मुंबई एसीबीच्या पथकाने धाड टाकत रोख रकमांनी भरलेली बॅग हस्तगत केली. या प्रकरणात घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता उप सचिव डॉ. दीपक आवटी तसेच स्वच्छता प्रभारी निरीक्षक समीर म्हात्रे या दोघांना अटक करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, स्वच्छता कंत्राटदाराच्या प्रलंबित बिलाच्या मोबदल्यात १५ टक्के कमिशनची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार १ लाख ४० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना नवी मुंबई एसीबीने कारवाई करत दोघांनाही रंगेहात पकडले. या कारवाईनंतर एपीएमसी प्रशासनातील विविध विभागांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, संबंधित प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.


Most Popular News of this Week