Breaking News

उरणचा १२ वर्षीय जलतरणपटू मयंक म्हात्रेचा नवा विक्रम

उरणचा १२ वर्षीय जलतरणपटू मयंक म्हात्रेचा नवा विक्रम


भाऊचा धाक्का ते करंजा जेट्टी २४ किमी अंतर ७ तास २१ मिनिटे ६ सेकंदात केले पार

उरण (वार्ताहर) उरणचा १२ वर्षीय जलतरणपटू मयंक म्हात्रे याने भाऊचा धाक्का ते करंजा जेट्टी हे २४ किमी अंतर त्याने ७ तास २१ मिनिटे ६ सेकंदया वेळेत पार करून नवा विक्रम स्थापित केला आहे. मयंक भाऊचा धक्का ते करंजा जेट्टी पोहन पार करणारा पहिला जलतरणपटू ठरला आहे. याआधी त्याने धरमतर ते करंजा आणि घारापुरी ते करंजा हे प्रवाह पोहून पार केले आहे. उरण सेंटमेरीज कॉन्व्हेन्ट स्कुलमध्ये इयत्ता सातवीमध्ये शिकणाऱ्या मयंक दिनेश म्हात्रे याने हा नवा विक्रम स्थापित करून भाऊचा धक्का ते करंजा जेट्टी पोहून पार करणारा तो पहिला जलतरणपटू ठरला आहे. महत्वाचे म्हणजे मयंक याने याआधी धरमतर ते करंजा जेट्टी हे १८ किमी अंतर पोहून पार केले. तर घारापुरी ते करंजा जेट्टी हे १८ कमी अंतर पोहून पार करणारा देखील तो पहिला जलतरणपटू ठरला. सलग तीन वर्षे मयंक याने तीन समुद्रीय प्रवाह पोहून पार केल्याने तो या तीनही प्रवाह पार करणारा पहिला जलतरणपटू ठरला आहे. सोमवारी पहाटे ३:५५ वाजता भाऊचा धक्का येथून मयंकने समुद्राच्या लाटांवर झेप घेत नव्या विक्रमाला सुरुवात केली. पहाटेचा काळोख, गार हवा, पान्याच्या लाटा त्यातच मोठमोठ्या बोटींचा येणारा अडथळा यातून मार्ग काढत त्याने निर्धारीत वेळेत हा विक्रम पूर्ण केला आहे. त्याने केलेल्या या विक्रमची नोंद महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेने दखल घेत त्याच्या विक्रमची नोंद केली आहे. तर करंजा जेट्टी येथे विक्रम पूर्ण होताच करंजा ग्रामस्थांनी त्याचे जल्लोषत स्वागतं करत त्याचे अभिनंदन केले. बदलते हवामान आणि खडतर प्रवास यातून कुठेतरी मयंकाचा आजचा विक्रमी प्रवास मी थांबवण्याच्या पवित्र्यात होतो. मात्र त्याची जिद्ध आणि तळमळ पहाता त्याला त्याच्या प्रयत्नासाठी साथ दिली. त्याने केलेला विक्रम भाऊचा धक्का ते करंजा जेट्टी पोहून पार करणारा तो पहिला जलतरणपटू ठरला आहे. येत्या काळात त्याला परदेशातील एक तरी चॅनल पोहताना आम्हाला पहायचं आहे अशा भावना यावेळी मयंक याचे वडील दिनेश म्हात्रे यांनी व्यक्त केल्या.


Most Popular News of this Week