अर्थसंकल्पीय विशेष सभेला भाजपच्या १२ सदस्यांच्या दांड्या...
उरण नगराध्यक्षांची विशेष अधिकाराचा वापर करून सभागृहात ९८ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी
उरण (प्रतिनिधी) - उरण नगर परिषदेच्या सत्ताधारी मविआने अंदाजित अर्थसंकल्पाच्या मंजुरीसाठी बोलाविलेल्या विशेष सभेकडे भाजपच्या १२ सदस्यांनीही पाठ फिरविली.कोरमअभावी अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाली नाही. मात्र सभागृहात नगराध्यक्षांनी विशेष अधिकाराचा वापर करून २०२६-२७ या वर्षातील ९८ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर करून अंतिम मंजुरीसाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती नगराध्यक्षा भावनाताई घाणेकर यांनी दिली. उरण नगर परिषदेच्या चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर नुकत्याच पार पडलेल्या निवडणूकीत राजकीय उलथापालथ झाली आहे. नगराध्यक्षपदी मविआ शरद पवार गटाच्या भावनाताई घाणेकर निवडून आलेल्या आहेत. २१ पैकी १२ जागा भाजपने स्वबळावरच जिंकून बहुमताचा आकडा गाठला आहे.या उलट नगराध्यक्षपदी मविआने पटकावले असले तरी त्यांचे फक्त ९ सदस्यच निवडून आले आहेत.बहमत नसल्याने मात्र उनपच्या सत्तेत मविआची चांगलीच कोंडी होत चालली आहे. मविआला कोंडीत पकडण्यासाठी भाजपनेही राजकीय डावपेच खेळण्यास सुरुवातीपासूनच सुरू केले आहेत.याचा प्रत्यय वारंवार विविध बैठका, सभागृहात पाहायला मिळत आहे.
उरण नगर परिषदेचा अंदाजित अर्थसंकल्प २८ फेब्रुवारीपर्यंत मंजूर करून घेण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.या आदेशानुसार नगराध्यक्षा भावनाताई घाणेकर यांनी एकाच दिवशी शुक्रवारी (२७) स्थायी समिती व विशेष सभा बोलावली होती. मात्र २०२६-२०२७ या वर्षाच्या अंदाजित अर्थसंकल्पाच्या मंजुरीसाठी बोलाविलेल्या या दोन्ही बैठकांना भाजपच्या १२ सदस्यांनीही पाठ फिरवली. मात्र विशेष अर्थसंकल्पाच्या सभेआधीच मुख्याधिकारी समीर जाधव हे मंगळवारपासून (२४) रजेवर गेले आहेत.रजेच्या कालावधी दरम्यान त्यांच्याजागी अन्य मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यानीही मुख्याधिकारीपदाचा तात्पुरता भार उनपचे कार्यालयीन अधीक्षक राजेंद्र घाडगे यांच्याकडे सोपविला आहे.
दरम्यान शुक्रवारी नगराध्यक्षांनी बोलाविलेल्या स्थायी समिती व विशेष सभा या दोन्ही बैठकांसाठी भाजपचे १२ सदस्यही उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे सभागृहात कोरमअभावी २०२६-२७ या वर्षातील ९८ कोटींच्या अर्थसंकल्पाची विशेष सभा तहकूब करण्यात आली असल्याची माहिती उनपचे कार्यालयीन अधीक्षक राजेंद्र घाडगे यांनी दिली.तर स्थायी समिती व विशेष सभेत अर्थसंकल्पाच्या मंजूरीची पुर्णपणे जबाबदारी नगराध्यक्षांचीच आहे.त्यामुळे भाजप सदस्यांच्या स्थायी समिती , उपस्थिती, गैरउपस्थितीचा प्रश्नच उद्भवत नाही.अशी प्रतिक्रिया उनपचे भाजपचे उपनगराध्यक्ष रवि भोईर यांनी दिली.
उनपच्या २०२६- २७ या वर्षाच्या अंदाजपत्रकीय अर्थसंकल्पाची विशेष सभा कोरमअभावी तहकूब झाली.मात्र सभागृहात विशेष अधिकाराचा वापर करून अर्थसंकल्प सभागृहात मंजूर करून घेण्यात आला आहे.अर्थसंकल्प अंतिम मंजुरीसाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती नगराध्यक्षा भावनाताई घाणेकर यांनी दिली.
जरी नगराध्यक्षपद मिळवून सत्ता मविआकडे आली असली तरी बहमत मात्र भाजपकडे असल्याने उनपमध्ये राजकीय दोलायमान स्थिती निर्माण झाली आहे.अर्थसंकल्पाच्या मंजुरीसाठी बोलावण्यात आलेल्या विशेष सभेकडे भाजपच्या १२ सदस्यांनीही पाठ फिरवून आगामी काळात मविआच्या सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा राजकीय खेळ सुरू केला आहे.त्यामुळे उनपच्या विकासाचा गाडा मविआच्या नगराध्यक्ष पुढे कसा नेतात याकडेच उरणवासियांचे लक्ष लागून राहाणारे आहे.
Most Popular News of this Week
तुर्भेगावात एक गाव एक होळी...
तुर्भे (वार्ताहर) - तुर्भेगवात एक गाव होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला....
अर्थसंकल्पीय विशेष सभेला...
उरण नगराध्यक्षांची विशेष अधिकाराचा वापर करून सभागृहात ९८ कोटींच्या...
विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका...
मनसे नगरसेवक अभिजीत देसाईचे आयुक्तांना साकडेबेलापूर (वार्ताहर) - प्रभाग...
कळंबोलीतील अनधिकृत...
नोटीसा लावून बेवारस वाहने जप्तपनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका आयुक्त...
कचरा व्यवस्थापन नियमांचे...
कल्याण (वार्ताहर) - कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...
आ.मंदा म्हात्रे यांच्या...
बेलापूर (वार्ताहर) - आ.मंदा म्हात्रे यांनी असंख्य महिलांसह होळी व...
