Breaking News

वणव्याच्या आगीमुळे उरणमधील निसर्गसंपदेसह पर्यावरण धोक्यात!

वणव्याच्या आगीमुळे उरणमधील निसर्गसंपदेसह पर्यावरण धोक्यात!

वणवे लावणाऱ्यांवर कडक कारवाईची पर्यावरणप्रेमींकडून मागणी

उरण (वार्ताहर) - उरण तालुक्‍यात सुरु असलेल्या वणव्यांमुळे निसर्गसंपदा आणि पर्यावरण साखळी धोक्यात आली आहे. या वणव्यामुळे लागणाऱ्या आगीमुळे माळरान, डोंगररांगा आणि पर्यटन क्षेत्रांचे निसर्गसौंदर्य ही खराब होत आहे. गंभीर बाब म्हणजे औषधी वनस्पती, जंगली प्राणी, पक्षी, कीटकांचा मूत्यू होतो.याशिवाय वणव्यांमुळे वित्तहानी आणि अनमोल जीवितहानी ही मोठ्या प्रमाणात होत आहे. एकंदरीत हे वणवे आपोआप लागत नाहीत तर काही व्यक्तींकडून आपल्या वैयक्ति स्वार्थापोटी निसर्गसंपदा असलेल्या जंगलाच्या ठिकाणी वणवे लावले जात आहेत. त्यामुळे अशाप्रकारे वणवे लावणाऱ्यांवर संबंधित यंत्रणांनी कडक कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे. मात्र शासनाचे सर्व विभाग कारवाई करण्यासंदर्भात तसेच जनजागृती करण्यासाठी कमी पडत असल्याची बाब सध्या समोर येताना दिसत आहे. 

उरण हा मुंबई व नवीमुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेला निसर्ग सौंदर्याने नटलेला तालुका आहे. मात्र वाढते औद्योगिकीकरण आणि नागरिकरण यामुळे या ठिकाणच्या निसर्ग सौंदर्याचा हळूहळू ऱ्हास होऊ लागला आहे. तसेच काही नागरिक हे स्वतः च्या स्वार्थापोटी माळरान, डोंगररांगाना आगी लावून पळ काढत आहेत. त्यामुळे माळरान, डोंगररांगांचे आणि पर्यटन क्षेत्रांचे निसर्गसौंदर्य ही अशा आगीच्या भक्ष्यस्थानी खराब होत आहे.औषधी वनस्पती,जंगली प्राणी,पक्षी, कीटकांचा मूत्यू होत आहे. याशिवाय वणव्यांमुळे वित्तहानी आणि अनमोल जीवितहानी ही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे वणवे लावणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे.


Most Popular News of this Week