ठाणे बेलापूर मार्गावर रात्रीच्या सुमारास वाहतूक कोंडीची समस्या तीव्र!
वाहतूक कोडीतुन आमची सुटका करा ; त्रस्त नागरिकांची मागणी
ऐरोली - ठाणे व नवी मुंबईसह इतर मार्गांना जोडणाऱ्या ठाणे-बेलापूर या महत्वाच्या मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या काही केल्या कमी होतांना दिसत नाही. विशेष म्हणजे रात्रीच्या सुमारास या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची होणारी वर्दळ आणि वाहनांच्या चालकांकडून केल्या जाणाऱ्या बेशिस्तीच्या प्रकारामुळे मागील अनेक महिन्यांपासून वाहतूक कोंडीची समस्या कायम असल्याचे दिसत आहे. वाहतूक कोंडीच्या या समस्येमुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांसह दुचाकीस्वार व इतर वाहन धारक यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या वाहतूक कोंडीपासून आमची सुटका करावी, अशी मागणी प्रवाशी नागरिकांकडून केली जात आहे. विशेषकरून रात्रीच्या सुमारास तुर्भसह महापे, रबाळेपासून पुढे ऐरोली परिसरात ही वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याने वाहने एका जागेवर बराच वेळपर्यंत उभी राहत असल्याने या मार्गावर वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. हे दृश्य आजमितीस दररोजचे झाले असल्याने एनएमएमटी व बेस्टमधून दैनंदिन प्रवास करणारे नागरिक अक्षरश: त्रस्त झाले असून, या समस्येमुळे त्यांना आपल्या घरी विलंबाने पोहचण्याचा त्रास सहन करावा लागतो. विशेषकरून रात्रीच्या सुमारास या मार्गावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ सुरु असते व अशा वाहनांचे चालक हे एका लेनमध्ये आपली वाहने न चालविताख, मनमानेल त्याप्रमाणे वाकडी तिकड्या पध्दतीने चालवतांना दिसतात. व या बेशिस्तीच्या प्रकारामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होण्यासह अधूनमधून अपघाती घटनाही घडतांना दिसतात. एकंदरीत या वाहतूक कोंडीमुळे इंधन आणि वेळ वाया जात असून नागरिक हैराण झाले आहेत.
महापे ते रबाळे टी सर्कलपर्यंत होणारी वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबलचक रांगा लागत असल्याने वाहनधारकांना विशेषकरून एनएमएमटी व बेस्टच्या बसेसना तासन्तास ताटकळत राहावे लागते. वाहनांच्या रांगा लागल्याने वाहनधारक व प्रवाशांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागतो. या वाहतूक कोंडीत अनेकदा रुग्णावाहिकाही अडकून पडतांना दिसतात. .त्यामुळे गंभीर रुग्ण हॉस्पिटलमध्ये पोहोचायच्या आतच दगावण्याची भीती आहे. मात्र,असे असले तरी ही वाहतूक कोंडी टूर करण्यासाठी संबंधित यंत्रणा पाहिजे त्या प्रमाणात पुढाकार घेताना दिसत नसल्याचा आरोप प्रवाशी नागरिकांकडून केला जात आहे. दिवसा रबाळे वाहतूक शाखेचे कर्मचारी ठराविक ठिकाणी न चुकता नेहमी उभे असतात; पण ते केवळ वाहनधारकांना अडवून दंडाच्या पावत्या फाडण्यात किंवा त्यांना नाडून वरकमाई" करण्यातच मश्गुल असतात असा आरोप याविषयी बोलतांना जागरूक नागरिकांनी केला आहे. रात्रीच्या सुमारास तर बहूतांश वेळा वाहतूक पोलिस उपलब्ध होत नसल्याने मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा नागरिकांना त्रास होत असल्याने, या वाहतूक कोंडीपासून आमची सुटका करावी, अशी मागणी प्रवाशी नागरिकांकडून जोर धरत आहे.
कोंडीतून सुटण्यासाठी फुटपाथचा वापर
ठाणे बेलापूर मार्गावर होणाऱ्या या वाहतूक कोंडीतून सुटण्यासाठी काही दुचाकीस्वार रस्त्यालगत असलेल्या नागरिकांच्या हक्काच्या फुटपाथवरून चक्क आपली वाहने भरधावपणे नेतांना दिसतात. या प्रकारातून अपघाती घटना होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने या प्रकारांना पायबंद घालण्यासाठी उपाय योजना करण्याची मागणी होत आहे.
Most Popular News of this Week
बेलापूर येथील प्रस्तावीत...
खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...
लॉजिस्टिक पार्क नोडमधील...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...
शासकीय वनजमीनीचा वन...
वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...
कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...
नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...
परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...
ठाणे मनपा सभागृहनेतेपदी...
महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केली घोषणाठाणे (वार्ताहर)- ठाणे...
