Breaking News

नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न... नवी मुंबईत काँग्रेस पक्ष मजबूतीचा कार्यकर्त्यांचा निर्धार

नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न... नवी मुंबईत काँग्रेस पक्ष मजबूतीचा कार्यकर्त्यांचा निर्धार

वाशी (प्रतिनिधी) - आगामी नवी मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने मोर्चेबांधणीस सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नवी मुंबई जिल्हा कांग्रेस कमिटीची बैठक काल सोमवारी कांग्रेस भवन, वाशी येथे जिल्हाध्यक्ष पूनम मिथुन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला काँग्रेस कार्यकते व पदाधिकारी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी भविष्यामध्ये नवी मुंबई जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचा निर्धार काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या बैठकीला डॉ.मोनिका जगताप (विधानसभा प्रभारी-१५० विधानसभा मतदारसंघ) उपस्थित होत्या. या बैठकीमध्ये नवी मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसतर्फे निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेल्या अनेक उमेदवारचे अर्ज घेण्यात आले. या बैठकीदरम्यान ऐरोली विभागातून अनेक युवकांनी नवी मुंबई जिल्हा काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पूनम पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेसमध्ये प्रवेश केला व भविष्यामध्ये नवी मुंबई जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. या बैठकीला जिल्ह्याचे प्रवक्ते रत्नाकर कुदळे, माजी महिला अध्यक्षा उज्वला साळवे, उपाध्यक्ष संतोष सुतार, तुकाराम कदम, युवा नेते संदेश बनसोडे, दत्ता माने, संतोष कांबळे, रतन तांडेल, झोया, रोहित ढेकळे, सुनील कांबळे व इतर अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.


Most Popular News of this Week

बेलापूर येथील प्रस्तावीत...

खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...

लॉजिस्टिक पार्क नोडमधील...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...

शासकीय वनजमीनीचा वन...

वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...

कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...

नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...

परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...

सारसोळेगावातील अनधिकृत...

नेरुळ (वार्ताहर)- नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या...