पनवेल महापालिका निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार! कामोठे कॉलनी फोरमचा मेळाव्यात निर्धार
पनवेल महापालिका निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार! कामोठे कॉलनी फोरमचा मेळाव्यात निर्धार
पनवेल (वार्ताहर) - आगामी पनवेल महापालिका निवडणुकांच्या पार्थभूमीवर कामोठे कॉलनी फोरमतर्फे आयोजित निर्धार मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी कामोठे शहरातील प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नवा राजकीय पर्याय उभा करण्याचा संकल्प व्यक्त करण्यासह या निवडणूकीत पूर्ण ताकदीने लढण्याचा निर्धारही फोरमच्या सदस्यांनी व्यक्त केला. कामोठे कॉलनी फोरमने अनेक वर्षांपासून पाणीटंचाई, वीज समस्या, खड्डेमय रस्ते, आरोग्य सुविधा, अग्निशमन केंद्र, मलनिस्सारण व्यवस्था, सार्वजनिक वाहतूक यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला आहे. या समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित राहिल्या असून, सत्ताधारी लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष झाल्याची तीव्र नाराजी जनतेमध्ये आहे. याच कारणामुळे कामोठेकर नागरिकांमध्ये प्रस्थापित राजकारणाबद्दल भ्रमनिरास निर्माण झाला असून, लोक शहरासाठी स्वच्छ, प्रामाणिक आणि जबाबदार पर्यायाच्या शोधात आहेत. फोरमने दिलेल्या माहितीनुसार, कामोठे शहरातील तिन्ही प्रभागांमध्ये पडलेल्या आरक्षणानुसार एकूण ११ जागांसाठी निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार इच्छुक आहेत. हे सर्व उमेदवार सुशिक्षित, समाजाभिमुख आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव सक्रिय असलेले कार्यकर्ते आहेत. प्रस्थापित राजकीय पक्षांकडून होणाऱ्या पैशाच्या आमिषाला न बळी पडता, विकासाच्या मुद्यांवर निवडणूक लढवण्याचा निर्धार फोरमतर्फे यावेळी व्यक्त करण्यात आला. अन्यायकारक मालमत्ता कर कमी करणे, खड्डेमुक्त व टिकाऊ रस्ते, शाधत जलपुरवठा व्यवस्था, सार्वजनिक आरोग्य केंद्र व प्राथमिक वैद्यकीय सुविधा, सार्वजनिक वाहतूक सेवा कार्यान्वित करणे, रखडलेले अग्निशमन केंद्र तातडीने सुरु करणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी सेवा व सुविधा उपलब्ध करणे, क्रीडांगणे, उद्याने आणि सार्वजनिक जागांची दुरुस्ती, खाजगी शाळांच्या वाढलेल्या फीचे नियमन करणे, मलनिस्सारण व्यवस्थेचे सर्वांगीण उन्नचन आदी निवडणूकीत लढवण्यात येणारे कामोठे फोरमचे महत्वाचे प्रमुख मुद्दे आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन कॉलनी फोरमच्या अध्यक्षा लीना गरड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कामोठे कॉलनी फोरम अध्यक्ष मंगेश अढाव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी खारघर कॉलनी फोरमचे मुख्य समन्वयक मधू पाटील, महिला अध्यक्षा जयश्री झा, अँड. समाधान काशीद, बापू साळुंखे, अनिल पवार, पोपट आवारी, निलेश आहेर, जयवंत खरात, प्रवीण भालतडक, गीता कुडाळकर, शुभांगी जाधव, उषाकिरण शिंगे, मुक्ता घुगे आणि शीतल दिनकर, सुप्रिया माने आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
Most Popular News of this Week
बेलापूर येथील प्रस्तावीत...
खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...
लॉजिस्टिक पार्क नोडमधील...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...
शासकीय वनजमीनीचा वन...
वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...
कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...
नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...
परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...
सारसोळेगावातील अनधिकृत...
नेरुळ (वार्ताहर)- नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या...
