Breaking News

नवी मुंबई विमानतळास २५ डिसेंबरपर्यंत दिबांचं नाव द्या, नाहीतर अटल सेतू बंद करू!

नवी मुंबई विमानतळास २५ डिसेंबरपर्यंत दिबांचं नाव द्या, नाहीतर अटल सेतू बंद करू!

प्रकल्पग्रस्त नेते दशरथ पाटील यांचा इशारा

नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे कैवारी लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी भूमिपुत्र आग्रही असतांनाही आजवर या मागणीबाबत ठाम असा निर्णय होतांना दिसत नसल्याने दिबांच्या नावासाठी पुन्हा एकदा प्रकल्पग्रस्त नागरिक नेते आक्रमक झाले आहेत. त्यामुळे २५ डिसेंबरपर्यंत नवी मुंबई विमानतळास दिबांच नाव द्या, नाहीतर अटल सेतू बंद करू असा इशारा प्रकल्पग्रस्त नेते दशरथ पाटील यांनी सरकारला दिला आहे यासंदर्भात प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका मांडतांना दशरथ पाटील म्हणाले की, दिबांचे नाव अंतिम कॅंबिनेटपर्यंत गेले आहे. आणि याबाबत काय निर्णय घ्यावा याबाबतचा अंतिम अधिकार पंतप्रधान यांचा असतो. जो पर्यंत ही गोष्ट पंतप्रधानाच्या कानावर घातली जाणार नाहीतोपर्यंत नावाच्या संदर्भात विचार होणार नाही असे स्पष्ट करून आक्रमक आंदोलनाचा पवित्रा घेणे हे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी मी सत्ताधाऱ्यांमधील काही ठराविक व्यक्तीबरोबर बैठक घेवू इच्छित असून त्यांना नम्रपूर्वक सांगू इच्छितो की, दि.१२ तारखेपर्यंत देशाचे पंतप्रधान गृहमंत्री यांची भेट घ्यावी, जेणेकरून यासंदर्भात २५ डिसेंबरला विमानतळाचे नामांतरण होईल. जर असा निर्णय झाल्यास आम्ही अटल सेतू बंद करू असा एकप्रकारे निर्वाणीचा इशारा दशरथ पाटील यांनी केंद्र राज्य सरकारला दिला आहे.

दरम्यान, नवी मुंबई विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे ऑक्टोबर महिन्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते उदघाटन पार पडलेयावेळी पंतप्रधानांनी आपल्या भाषणात प्रकल्पग्रस्तांचे कैवारी लोकनेते दिबा पाटील यांच्या कार्याचा गौरव केला होता. त्यावेळी पंतप्रधानांकडून विमानतळास दिबांच्या नावाबाबत घोषणा होईल अशी तमाम प्रकल्पग्रस्तांना आशा होती. मात्र प्रत्यक्षात अशी काहीच घोषणा  झाल्याने सर्वांची भ्रमनिराशा झाली होती. विशेषकरून राज्य सरकारने याबाबतचा प्रस्तावही केंद्राकडे पाठविला आहे. परंतू दिबांचे विमानतळास नाव देण्याबाबतची भूमिकाच केंद्र सरकारकडून जाहीर होत नसल्याने वारंवार प्रकल्पग्रस्त नेत्यांना आंदोलनाची भाषा करावी लागत आहे. त्यात आता पुन्हा एकदा सरकारला इशारा देण्यात आल्याने सरकार नेमकी याबाबत काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


Most Popular News of this Week

बेलापूर येथील प्रस्तावीत...

खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...

लॉजिस्टिक पार्क नोडमधील...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...

शासकीय वनजमीनीचा वन...

वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...

कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...

नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...

परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...

सारसोळेगावातील अनधिकृत...

नेरुळ (वार्ताहर)- नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या...