उलव्यात सिलेंडरच्या स्फोटात अवैध धाबा जळून खाक
उलवे (वार्ताहर) - उलवे से-८ मधील प्लॉट नंबर-२ याठिकाणी असलेल्या बेकायदेशीर धाब्याला गुरुवारी रात्री ४.४५ वाजेच्या सुमारास आग लागल्याने बाजूच्या इमारतीतील रहिवाश्यांची धावपळ उडाली होती. या घटनेत, धाब्याच्याठिकाणी सिलेंडरचा स्फोट होवून संपूर्ण धाबाच जळून खाक झाला. यामुळे परिसरातील बेकायदा धाब्यांचा आणि अतिक्रमणांचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. उलवे बामणडोंगरीगाव येथील भाजपा पदाधिकारी सुहास गोंधळी यांचा हा अवैध धाबा असल्याचे बोलले जाते. रात्रभर या धाब्यावर बेकायदेशीर दारू विक्री, दारू पार्ट्या चालत होत्या व त्यामुळे हा धाबा दारूचा अड्डाच बनला होता. सदरची घटना घडल्यानंतर आजुबाजुच्या इमारतीतील रहिवाश्यांनी पोलीस आणि अग्निशमन दलास दूरध्वनीव्दारे संपर्क साधून माहिती दिली. यानंतर घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाची गाडी पोहचली. परंतु त्यापूर्वीच सदर ढाब्यात असलेल्या दोन सिलेंडरचे स्फोट होऊन आगीचा भडका उडाला होता. हा भडका इतका प्रचंड मोठा होता की, आग विझवताना अग्निशमन दलाच्या जवानांना कसरत करावी लागली. सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग बाजूच्या इमारतीत गेली असती तर रात्रीच्या अंधारात झोपेत असलेल्या निरपराध लोकांचे जीव गेले असते. दरम्यान, यापूर्वी गतवर्षी उलव्यातील जावळे गावात सिलेंडरच्या स्फोटाने आग लागून एकाच घरातील चार जनांना जीव गमवावा लागला होता. त्यामुळे रात्री तीच पुनरावृत्ती झाली असती तर मोठी हानी झाली असती. त्यामुळे या अवैध धंद्याना पाठीशी कोण घालत आहेत असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. दरम्यान, सुहास गोंधळी भाजपचा पदाधिकारी असल्यामुळे या अवैध धाब्यावर पोलिसांची विशेष मेहरबानी होती का? असा देखील प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. तसेच सिडकोच्या भूखंडावरील या बेकायदेशीर धाब्यावर सिडकोचे अतिक्रमण विभाग देखील हप्ते घेऊन मुग गिळून गप्प बसले होते का? असे अनेक सवाल उलव्यातील जनता यानिमित्ताने उपस्थित करत आहे. उलवे सेक्टर-१९ मधील भाजपा कार्यालयासमोर ही घटना घडली तेव्हा त्याठिकाणी वाहतूक पोलीस आणि कीतील पोलीस येऊन तो टॅंकर पोलीस ठाण्यात घेऊन गेले होते. या टॅकरचा एकही कागद अस्तित्वात नव्हता. परंतु सुहास गोंधळी भाजपचा कार्यकर्ता असल्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंद केला नसल्याचे समजते. धाबा मालक हा भाजपचा पदाधिकारी तसेच आमदार महेश बालदी यांचा जवळचा कार्यकर्ता गोंधळी असल्यामुळे पोलीस आणि सिडकोचे अतिक्रमण विभाग त्याच्यावर मेहरबान असल्याचे दिसून येत आहे. यानिमित्ताने उलवे पोलीस आणि संबंधित सिडको अधिकारी अशा अवैध धंदेवाल्यांना पाठीशी घालून उलवे शहर असुरक्षित करण्याचा प्रयत्न करत असल्याची नागरिकांत चर्चा आहे. उलव्यातील रस्ते फुटपाथवर बेकायदेशीर हातगाड्यांवर गॅस सिलेंडरचा सर्रास वापर केला जात आहे. फुटपाथवरून चालणाऱ्या नागरिकांना आणि रस्त्यावरील वाहनांना या हातगाड्यांवरील सिलेंडरचा धोका असताना त्यांच्यावर संबंधित सिडको अधिकारी, पोलीस कारवाई करताना दिसत नाहीत. त्यामुळे भविष्यात अशा गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन जीवितहानी झाल्यास आश्चर्य वाटायला नको अशा प्रतिक्रिया समाज मनातून व्यक्त होत आहेत.
Most Popular News of this Week
तुर्भेगावात एक गाव एक होळी...
तुर्भे (वार्ताहर) - तुर्भेगवात एक गाव होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला....
अर्थसंकल्पीय विशेष सभेला...
उरण नगराध्यक्षांची विशेष अधिकाराचा वापर करून सभागृहात ९८ कोटींच्या...
विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका...
मनसे नगरसेवक अभिजीत देसाईचे आयुक्तांना साकडेबेलापूर (वार्ताहर) - प्रभाग...
कळंबोलीतील अनधिकृत...
नोटीसा लावून बेवारस वाहने जप्तपनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका आयुक्त...
कचरा व्यवस्थापन नियमांचे...
कल्याण (वार्ताहर) - कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...
आ.मंदा म्हात्रे यांच्या...
बेलापूर (वार्ताहर) - आ.मंदा म्हात्रे यांनी असंख्य महिलांसह होळी व...
