खारघर रेल्वे स्थानक प्रवेशद्वारावर फेरीवाल्यांचा कब्जा
खारघर (वार्ताहर) - खारघर खारघर रेल्वे स्थानकात बेकायदा फेरीवाल्याचा सुळसुळाट झाला असून, खारघर रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वार असलेल्या मोकळ्या जागेत रेडिमेड कपडे, खेळणी, मोबाईल कव्हर, भेळ आणि फळ विक्रेत्यांनी अनधिकृतपणे व्यवसाय थाटला आहे. या प्रकारामुळे प्रवाशी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खारघर रेल्वे स्थानकातून दररोज जवळपास सव्वा लाख प्रवाशी प्रवास करतात. त्यामुळे खारघर रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर प्रवाशांची मोठी गर्दी असते. खारघर रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्रारावर रेडिमेड कपडे, खेळणी, मोबाईल कव्हर, भेळ आणि फळ विक्रेत्यांनी कब्जा केल्यामुळे रेल्वे प्रवाशांना गर्दीतून वाट काढत खारघर रेल्वे स्थानकात जाताना परतताना मार्ग काढावा लागत आहे. एवढेच नव्हे तर दिव्यांग व्यक्तीला खारघर रेल्वे स्थानकात प्रवेश करता येण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मार्गावर फेरीवाल्यानी कब्जा केल्याचे चित्र दिसत आहे. ८ वर्षांपूर्वी मुंबईतील एल्फिस्टन आणि परेल रेल्वे स्थानक यांना जोडणाऱ्या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत काही प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर रेल्वे स्थानक परिसरात दीडशे मीटर परिक्षेत्रात फेरीवाल्यांना मा.मुंबई उच्च न्यायालयाने मज्ञाव केला होता. मात्र त्यानंतरही रेल्वे स्थानक परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांकडून कब्जा केला जात असल्याने सायंकाळी पाच नंतर खारघर रेल्वे स्थानकातून बाहेर पडताना प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यासंदर्भात पनवेल रेल्वे पोलिस ठाण्याचे वपोनि विजय तायडे यांना संपर्क साधला असता, खारघर रेल्वे स्थानकात पोलीस पथक पाठवून खारघर रेल्वे स्थानक आणि प्रवेशद्वारावरील बेकायदा फेरीवाल्यांना हटविले जाईल असे त्यांनी सांगितले. दरम्यान, खारघर रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्रार अनधिकृत फेरीवाल्यांनी बस्तान मांडलेले असतानाही रेल्वे स्थानकांवर कार्यरत असलेले रेल्वे पोलीस, लोहमार्ग पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक आणि सिडको सुरक्षा रक्षक केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने प्रवाशी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
Most Popular News of this Week
नवी मुंबईतील सत्ताधारी...
नवी मुंबई (प्रतिनिधी) – राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे ओएसडी...
परिवहन समितीच्या सभेत...
एनएमएमटीच्या करारावरील चालक, वाहकांच्या पगारात भरघोस वाढड्रायव्हर,...
सीबीडीत मसाजच्या नावाखाली...
सात पिडित महिलांची सुटका; मॅनेजर महिलेस पोलिस कोठडी - नवी मुंबई (प्रतिनिधी)...
महापौर, उपमहापौरांसमवेत माजी...
नवी मुंबईतील विविध विषयासंदर्भात चर्चा; विकासाचा वेग वृद्धिंगत...
महापालिकेला फसविणाऱ्या...
अर्थसंकल्पीय चर्चेत शिवसेना नगरसेवक शिवराम पाटीलांची मागणी नवी मुंबई...
लॉजिस्टिक पार्क नोड येथील...
नवी मुंबई (प्रतिनिधी) – सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागातर्फे...
