Breaking News

मिरा भाईंदर महापालिकेत अर्बन हॅबिटॅट रिस्क रिझिलिअन्स प्रोग्रामची आढावा बैठक आयुक्तांच्या हस्ते क्लायमेट ऑक्शन प्लॅन पुस्तकाचे प्रकाशन

मिरा भाईंदर महापालिकेत अर्बन हॅबिटॅट रिस्क रिझिलिअन्स प्रोग्रामची आढावा बैठक आयुक्तांच्या हस्ते क्लायमेट ऑक्शन प्लॅन पुस्तकाचे प्रकाशन

भाईंदर (वार्ताहर)- गेल्या काही वर्षात मिरा -भाईंदर मध्ये वेगाने वाढ झाली आहे. अधिक इमारती, कमी मोकळी मैदाने आणि वाढते तापमान ,पूर ,उष्णता, प्रदूषण आणि शहराच्या पायाभूत सुविधा यांचा लोकांच्या दैनंदिन जीवनावर कसा परिणाम होतो याबाबतचा अभ्यास करून सिटी ऐंक्शन प्लॅन विकसित करण्यासाठी मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक् तथा प्रशासक राधाबिनोद . शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडिया (५५ पा) यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिका मुख्यालयात शहराच्या हवामान बदल या संदर्भात एक महत्त्वपूर्ण आढावा बेठक संपन्न झाली.

शहरातील वाढते तापमान, पावसाळ्यातील जलसंकट, नागरी भागातील बदल आणि रहिवाश्यांच्या दैनंदिन जीवनावर होणारे परिणाम यांचा सखोल अभ्यास त्यावर उपाययोजना या बैठकीत मांडण्यात आली. या बैठकीत क्लायमेटअंक्शन प्लॅन, अर्बन हॅबिटॅट रिस्क रिझिलिअन्स प्रोग्राम (१पारारे?) आणि त्यांची शहराला हवामान बदलाच्या आव्हानांपासून वाचवण्यासाठी होणारी उपयुक्तता यावर अर्थपूर्ण चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण म्हणजे मिरा भाइंदर महानगरपालिका आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडिया (५एपा) यांच्यात झालेला एमओयू स्वाक्षरी समारंभ हा होय. शहराच्या सुरक्षित, आणि हवामान-तटस्थ भविष्यासाठी दोन्ही संस्था एकत्र काम करणार आहेत. या कार्यक्रमाच्या दरम्यान आयुक् यांच्या हस्ते क्लायमेट अक्शन प्लॅन या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी आयुक्तांनी मिरा भाईंदर शहराला उष्णता पूर आणि इतर हवामान संबंधित आव्हानापासून सुरक्षित ठेवण्यासाठी करण्यात येणारे उपाय हे तात्पुरते करता, कायम स्वरूपी कसे करता येईल तसेच त्यात काय महत्त्वाच्या सुधारणा करता येईल त्यासाठी मिरा भाईंदर महापालिका प्रशासन आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट इंडिया विविध उपक्रम राबविणार आहेत.

या उपक्रमामुळे दैनंदिन जीवन अधिक आरामदायी होऊन वातावरण अधिक सुरक्षित होईल. पावसात शहर अधिक स्वच्छ हिरवे आणि आरोग्यदायी तसेच सर्व संघटना आणि महानगरपालिकेच्या क्षेत्रातील संघटना मिरा भाईंदर महानगरपालिका प्रशासन हवामान बदलाशी सामना करण्यासाठी विविध उपक्रम राबविल्यामुळे मिरा भाईंदर शहर एक महत्त्वाच आदर्श शहर बनू शकेल असा विश्वास यावेळी त्यांनी आयुक्तांनी व्यक् केला आहे. सदरची हि आढावा बैठक आणि पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपायुक् (मुख्यालय) डॉ. सचिन बांगर,शहर अभियंता दिपक खांबित, कार्यकारी अभियंता (पाणी पुरवठा विभाग) शरद नाणेगावकर,अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र चव्हाण, सहायक आयुक् योगेश गुणीजन तसेच आगा खान एजन्सी फॉर हॉब्टॅट इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा लांगा विभागप्रमुख जुबेर शेख हे उपस्थित होते.


Most Popular News of this Week

बेलापूर येथील प्रस्तावीत...

खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...

लॉजिस्टिक पार्क नोडमधील...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...

शासकीय वनजमीनीचा वन...

वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...

कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...

नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...

परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...

ठाणे मनपा सभागृहनेतेपदी...

महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केली घोषणाठाणे (वार्ताहर)- ठाणे...