परिवहन समितीच्या सभेत वेतनवाढीस मंजुरी...
एनएमएमटीच्या करारावरील चालक, वाहकांच्या पगारात भरघोस वाढ
ड्रायव्हर, कंडक्टर यांना मिळणार मासिक २४ ऐवजी ३१ हजार ठोक पगार
नवी मुंबई (प्रतिनिधी) - तब्बल सहा वर्षाच्या प्रशासकीय राजवटीनंतर वनमंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या सत्तेची धुरा सांभाळणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी ठोक पगार कर्मचाऱ्यांसाठी पगारवाढीचे सत्र सुरु केले असून काल परिवहन समितीच्या बैठकीत तब्बळ १३९८ करारावरील बस चालक, बस कंडक्टर व अन्य १५० कर्मचारी अशा सर्व ठोक पगारावरील कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात ७ हजारांची वाढ करण्यात आली आहे नवी मुंबई परिवहन सेवेच्या सभापतीपदी विकास झंझाळ यांची निवड झाल्यापासून त्यांनी परिवहन सेवेच्या ढिसाळ गैरकारभाराविरुध्द दंड थोपटले असून हा उपक्रम तोट्यातून बाहेर काढण्याचा संकल्प सोडला आहे. काल परिवहन समितीच्या बैठकीत करारावरील ठोक पगार कर्मचाऱ्यांना असणारा मेडिकल इन्शुरन्स तीन लाखांवरुन पाच लाख करण्यात आला आहे. तर ठोक पगारावरील बस चालक, कंडक्टर व अन्य दिडशे कर्मचाऱ्यांसाठी मासिक ७ हजारांची वेतनवाढ तसेच दरवर्षी यामध्ये एक हजारांची वाढ देण्याचा प्रस्ताव यावेळी मंजूर करण्यात आला. परिवहन सदस्य राहुल शिंदे यांनी हा तातडीचा प्रस्ताव सभेसमोर मांडला असता सर्वानुमते या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. या पगारवाढीमुळे परिवहन सेवेवर दरमहा एक कोटींचा तर वार्षीक १२ कोटींचा भार पडणार आहे. यासंदर्भात सभापती झंझाड म्हणाले की, ठोक पगारावरील कर्मचाऱ्यांना कित्येक वर्षांपासून कमी पगारात काम करावे लागत आहे. मात्र आता ना. गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखालील भाजप सत्तेमध्ये आल्यामुळे त्यांना पगारवाढ व कायम नोकरीची आशा निर्माण झाली आहे. कायम नोकरीत सामावण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही कटीबध्द असून त्यामध्ये न्यायालयीन अडचणी येत आहेत, तुर्तास ना.गणेश नाईकांच्या आदेशानुसार आम्ही माजी खा.संजीव नाईक यांचा आजचा वाढदिवसाचे औचित्य साधत परिवहन कर्मचाऱ्यांना ही गोड बातमी दिल्याचे विकास झंझाड यांनी दै.लोकदृष्टीशी बोलताना स्पष्ट केले.
Most Popular News of this Week
नवी मुंबईतील सत्ताधारी...
नवी मुंबई (प्रतिनिधी) – राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे ओएसडी...
परिवहन समितीच्या सभेत...
एनएमएमटीच्या करारावरील चालक, वाहकांच्या पगारात भरघोस वाढड्रायव्हर,...
सीबीडीत मसाजच्या नावाखाली...
सात पिडित महिलांची सुटका; मॅनेजर महिलेस पोलिस कोठडी - नवी मुंबई (प्रतिनिधी)...
महापौर, उपमहापौरांसमवेत माजी...
नवी मुंबईतील विविध विषयासंदर्भात चर्चा; विकासाचा वेग वृद्धिंगत...
महापालिकेला फसविणाऱ्या...
अर्थसंकल्पीय चर्चेत शिवसेना नगरसेवक शिवराम पाटीलांची मागणी नवी मुंबई...
लॉजिस्टिक पार्क नोड येथील...
नवी मुंबई (प्रतिनिधी) – सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागातर्फे...
