महापालिकेला फसविणाऱ्या फोर्टीस इस्पितळाचा लिज रद्द करण्याचा प्रस्ताव सभागृहात आणा
महापालिकेला फसविणाऱ्या फोर्टीस इस्पितळाचा लिज रद्द करण्याचा प्रस्ताव सभागृहात आणा
अर्थसंकल्पीय चर्चेत शिवसेना नगरसेवक शिवराम पाटीलांची मागणी नवी मुंबई (प्रतिनिधी) - ५२ वर्षाच्या लिजवर हिरानंदानीला हॉस्पीटलसाठी महापालिकेनी जागा दिली. मात्र सदर जमीन मिळाल्यानंतर हिरानंदानी समुहाने सदरचे हॉस्पीटल फोर्टीसला दिले. या करारावर तत्कालीन माजी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय पत्तीवार व डॉ.नाथ यांनी सह्या केल्या असल्याचा आरोप करतानाच, सदर हॉस्पीटलने महापालिकेला फसविले असल्याने या इस्पितळाचे लिज (भाडे करारनामा) रद्द करण्याचा प्रस्ताव सभागृहात आणा अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक शिवराम पाटील यांनी महासभेत करून या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. याबाबतचा प्रस्ताव सभागृहात आणल्यास संपूर्ण नवी मुंबई धन्यवाद देईल अशी सूचना व मागणी नगरसेवक शिवराम पाटील यांनी सभागृह नेते सागर नाईक यांना उद्देशून केले. नवी मुंबईतील आरोग्य विषयक समस्यांबाबत सभागृहात आपले मत मांडतांना नगरसेवक शिवराम पाटील यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, नवी मुंबई महापालिकेच्या कोट्यानुसार २०२६ मध्ये सदर इस्पितळाने ५४७५ रूग्णांना उपचारविषयक सुविधा देणे गरजेचे होते. मात्र प्रत्यक्षात या इस्पितळाने ३९१ इतक्या रूग्णांना सुविधा दिली असल्याची बाब निदर्शनास आणून देत या इस्पितळाकडून महापालिकेसमवेत झालेल्या कराराचे कशा प्रकारे उल्लंघन केले जाते ही बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. वाशीत राहणारे व नवी मुंबई लायन्स क्लबचे अध्यक्ष असलेले दिवंगत डॉ.कुंभार यांच्या कुटूंबाकडून व लायन्स क्लबकडून वाशीतील मनपा इस्पितळासाठी संपूर्ण एमआयआर मशीन देण्याचे जाहीर केले होते. यासाठी त्यांनी जागा देण्याची मागणी महापालिकेकडे केली होती. मात्र कुणाचे तरी नाव लागेल या भीतीने ही सुविधा निर्माण होवू शकली नाही. जर त्यावेळी डॉ. कुंभार यांच्या नावाने ही सुविधा उपलब्ध झाली असती, तर अनेकांचे प्राण वाचले असते असेही शिवराम पाटील यांनी सभागृहात सांगितले. आरोग्य विषयक सेवा सुविधांच्या बाबतीत आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदर्श घ्या. जिथे संकट तिथे एकनाथ... अनाथांचा नाथ हे कुणी नाकारू शकत नाही. फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या इस्पितळांमध्ये सुमारे दीडशे शस्त्रक्रिया मोफत पार पडल्या. १८० एनजीओ प्लास्टि सर्जरी, ६० रूग्णांचे ब्रेन ट्युमर शस्त्रक्रिया व ८० रुग्णांवर किडनी विषयक शस्त्रक्रिया पार पडल्या. संपूर्ण राज्यात दवाखाने उघडले आहेत. हे सर्व करण्याची हिमंत व दानत लागते असे सांगत यावेळी नगरसेवक शिवराम पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर टिकाही केली. नवी मुंबई महापालिकेबरोबर झालेल्या करारानुसारच्या कोट्यानुसार २०२६ मध्ये फोर्टिस हिरानंदानी इस्पितळाने ५४७५ रूग्णांना उपचारविषयक सुविधा देणे गरजेचे होते. मात्र प्रत्यक्षात या इस्पितळाने ३९१ इतक्या रूग्णांना सुविधा दिली असल्याचे सांगत सदर इस्पितळाच्या मनमानी कारभाराचा पाढा वाचला. तसेच यावेळी त्यांनी सफाई कामगारांना ईएसआयचा लाभ मिळत नाही. त्यामुळे आरोग्य दृष्टीने महत्वाचा असलेला हा वर्ग संकटात आला असल्याने त्यांचा आरोग्य विमा एकतर पालिकेने, नाहीतर ठेकेदाराने काढावा अशी विनंती केली.
Most Popular News of this Week
नवी मुंबईतील सत्ताधारी...
नवी मुंबई (प्रतिनिधी) – राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे ओएसडी...
परिवहन समितीच्या सभेत...
एनएमएमटीच्या करारावरील चालक, वाहकांच्या पगारात भरघोस वाढड्रायव्हर,...
सीबीडीत मसाजच्या नावाखाली...
सात पिडित महिलांची सुटका; मॅनेजर महिलेस पोलिस कोठडी - नवी मुंबई (प्रतिनिधी)...
महापौर, उपमहापौरांसमवेत माजी...
नवी मुंबईतील विविध विषयासंदर्भात चर्चा; विकासाचा वेग वृद्धिंगत...
महापालिकेला फसविणाऱ्या...
अर्थसंकल्पीय चर्चेत शिवसेना नगरसेवक शिवराम पाटीलांची मागणी नवी मुंबई...
लॉजिस्टिक पार्क नोड येथील...
नवी मुंबई (प्रतिनिधी) – सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागातर्फे...
