Breaking News

लॉजिस्टिक पार्क नोड येथील कंटेनर यार्डवर सिडकोचा हातोडा

लॉजिस्टिक पार्क नोड येथील कंटेनर यार्डवर सिडकोचा हातोडा

नवी मुंबई (प्रतिनिधी) – सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागातर्फे अनधिकृत बांधकामांवरील कारवाईची मोहिम तीव्र केली आहे. त्यानुसार काल सिडकोच्या या विभागामार्फत लॉजिस्टीक पार्क नोड मौजे जांभूळ पाडा सर्वे नंबर ५०,५१,५२, मौजे बेलोंडा खार सर्वे नंबर ४६, ४७, ४८, ४९, ५०, ५१,५६, ५७, ५८, ५९ व ६० येथे निष्कासन मोहिम राबवून सिडको अधिसूचित, संपादित जागेवरील अंदाजे क्षेत्रफळ १२०४३७ चौ. मी. वरील कंटेनर यार्डवर कारवाई करण्यात आली. सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागाने केलेल्या या कारवाईत, यार्ड कार्यालय, पत्रा फेन्स इत्यादी स्वरूपाचे अनधिकृत बांधकाम पोकलेनच्या साहाय्याने तोडण्यात आले. उपरोक्त नमूद अतिक्रमण हे सिडकोच्या प्रचलित नियमावली व धोरणांचा भंग करुन व सिडको महामंडळाकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी न घेता उभारण्यात आले असल्यामुळे निष्कासित करण्यात आल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे. सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या निर्देशानुसार मुख्य नियंत्रक, अनधिकृत बांधकामे (नवी मुंबई) यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको अतिक्रमण विभागाचे अधिकारी अमित राजपूत, स्थानिक पोलिस अधिकारी व सिडको पोलीस पथक, महावितरण विभागाचे अधिकारी, सिडको सुरक्षा रक्षक आणि महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक यांच्या सहभागाने यशस्वीपणे ही कारवाईची मोहिम राबविण्यात आली. या कारवाईसाठी १० लेबर, प्रत्येकी १ ट्रक, पोकलेन असा लवाजमा तैनात ठेवण्यात आला होता.


Most Popular News of this Week

नवी मुंबईतील सत्ताधारी...

नवी मुंबई (प्रतिनिधी) – राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे ओएसडी...

परिवहन समितीच्या सभेत...

एनएमएमटीच्या करारावरील चालक, वाहकांच्या पगारात भरघोस वाढड्रायव्हर,...

सीबीडीत मसाजच्या नावाखाली...

सात पिडित महिलांची सुटका; मॅनेजर महिलेस पोलिस कोठडी - नवी मुंबई (प्रतिनिधी)...

महापौर, उपमहापौरांसमवेत माजी...

नवी मुंबईतील विविध विषयासंदर्भात चर्चा; विकासाचा वेग वृद्धिंगत...

महापालिकेला फसविणाऱ्या...

अर्थसंकल्पीय चर्चेत शिवसेना नगरसेवक शिवराम पाटीलांची मागणी नवी मुंबई...

लॉजिस्टिक पार्क नोड येथील...

नवी मुंबई (प्रतिनिधी) – सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागातर्फे...