Breaking News

सीबीडीत मसाजच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्या व्यवसायाचा गुन्हेशाखेकडून पर्दाफाश

सीबीडीत मसाजच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्या व्यवसायाचा गुन्हेशाखेकडून पर्दाफाश

सात पिडित महिलांची सुटका; मॅनेजर महिलेस पोलिस कोठडी - नवी मुंबई (प्रतिनिधी) – नवी मुंबईत लॉजेस व मसाज सेंटरमध्ये चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर गुन्हेशाखेने करडी नजर ठेवत अशा ठिकाणी चालणाऱ्या गैर व्यवसायांचा पर्दाफाश करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार नवी मुंबई गुन्हेशाखेच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने सीबीडी से-१५ येथील स्पा पॅलेस स्पा प्लॉट नंबर ४, शॉप नंबर ७, सेक्टर १५, त्रिशुल गोल्डमाईन, डेकॅथलॉनच्या मागे येथे मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. यावेळी सात पिडित महिलांची सुटका केली असून महिलांना वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्यां महिला मॅनेजरविरोधात गुन्हा दाखल करून अटकेनंतर तिला कोर्टाने पोलिस कोठडी मंजूर केली आहे. सीबीडीतील स्पा पॅलेस स्पा येथील मॅनेजर, मालक ही बॉडी मसाजसाठी असलेल्या ग्राहकांना ९ हजार रूपये दर सांगुन कमी जास्त रक्कम घेवुन मसाजच्या नावाने तेथे असलेल्या महिलांकडुन जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने बनावट ग्राहकाच्या मदतीने खातरजमा करून सदरठिकाणी छापा टाकला असता, सदरठिकाणी ७ पिडीत महिला वेश्यागमनाकरीता ठेवलेल्या मिळून आल्या. स्पाची मॅनेजर मालक नितु हजारीलाल प्रजापत, (३३) हिने उपरोक्त पिडित महिलांना बॉडी मसाज करण्याचे नावाने प्राप्त करून, नमुद शॉप हा वेश्या व्यवसायाकरीता वापरून, पिडीत मुलींना वेश्या व्यवसायासाठी बनावट ग्राहकास दाखवून व्यवसायाचा मोबदला म्हणून ८ हजार ५०० रूपये स्विकारल्याचे कारवाईतून निष्पन्न झाल्याने तिच्याविरोधात एन.आर.आय. पोलीस ठाणे येथे भा.न्या.सं.कलम १४३ (३), ३(५) सह अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा कलम १९५६ चे कलम ३, ४, ५ अन्वये दि. १५ एप्रिल २०२६ रोजी गुन्हा दाखल करून या गुन्ह्यात तिला अटक केली आहे. सदर मॅनेजरला कोर्टात हजर केले असता, दि. १८ एप्रिल २०२६ पर्यंतची पोलीस कोठडी मिळाली आहे. सहा. पोलीस आयुक्त, धर्मपाल बनसोडे, गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली वपोनिरी पृथ्वीराज घोरपडे, सपोनि योगेश देशमुख, सपोनि राजश्री शिंदे, पोउपनिरी सरिता गुडे, पोलिस हवालदार पावडे, भोये व इतर आदींच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली. दरम्यान, या कारवाईदरम्यान पथकाने सुटका केलेल्या ७ महिलांपैकी ४ महिला ह्या थायलंड देशातील तसेच २ मिझोराम व १ मणिपुर राज्यातील रहिवाशी आहेत. यावरून स्पा व वेश्या व्यवसायासाठी परदेशी महिलेचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे कारवाईतून स्पष्ट झाले आहे.


Most Popular News of this Week

नवी मुंबईतील सत्ताधारी...

नवी मुंबई (प्रतिनिधी) – राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे ओएसडी...

परिवहन समितीच्या सभेत...

एनएमएमटीच्या करारावरील चालक, वाहकांच्या पगारात भरघोस वाढड्रायव्हर,...

सीबीडीत मसाजच्या नावाखाली...

सात पिडित महिलांची सुटका; मॅनेजर महिलेस पोलिस कोठडी - नवी मुंबई (प्रतिनिधी)...

महापौर, उपमहापौरांसमवेत माजी...

नवी मुंबईतील विविध विषयासंदर्भात चर्चा; विकासाचा वेग वृद्धिंगत...

महापालिकेला फसविणाऱ्या...

अर्थसंकल्पीय चर्चेत शिवसेना नगरसेवक शिवराम पाटीलांची मागणी नवी मुंबई...

लॉजिस्टिक पार्क नोड येथील...

नवी मुंबई (प्रतिनिधी) – सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागातर्फे...