नवी मुंबईतील प्रलंबीत प्रश्नांवर आ. मंदा म्हात्रेंची मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा...
नवी मुंबईतील प्रलंबीत प्रश्नांवर आ. मंदा म्हात्रेंची मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा...
प्रस्तावित सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल प्रकल्पास गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश बेलापूर (वार्ताहर) – नवी मुंबईतील विविध प्रलंबित व महत्त्वाच्या विकासकामांबाबत आमदार मंदा म्हात्रे यांनी दि. १३ एप्रिल रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयातील दालनात त्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या बैठकीत नवी मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी विविध महत्त्वाच्या विषयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे आ.मंदा म्हात्रे यांनी सांगितले. विशेष म्हणजे प्रस्तावित सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज प्रकल्पाला लवकरात लवकर गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सांगण्यात येते. नवी मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याच्या दृष्टीने झोपडपट्टी पुनर्वसन योजनांना गती देण्याबाबत मुख्यमंत्र्यांसमवेत यावेळी सखोल चर्चा झाली. यामुळे गोर गरीब जनेतला हक्काचे घरे उपलब्ध होतील असा विश्वास व्यक्त केला. महिला बचत गटांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी उमेद मॉल' उभारण्याकरिता नवी मुंबईमध्ये १००० चौ. मी. चा भूखंड उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिडकोला आदेश दिले आहेत. आ.मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबईच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या प्रकल्पांबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला असून, या बैठकीमुळे शहराच्या पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा आणि महिला सक्षमीकरणाला नवी चालना मिळणार असल्याचा विश्वास आ.म्हात्रे यांच्यावतीने व्यक्त करण्यात आला.
Most Popular News of this Week
नवी मुंबईतील सत्ताधारी...
नवी मुंबई (प्रतिनिधी) – राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे ओएसडी...
परिवहन समितीच्या सभेत...
एनएमएमटीच्या करारावरील चालक, वाहकांच्या पगारात भरघोस वाढड्रायव्हर,...
सीबीडीत मसाजच्या नावाखाली...
सात पिडित महिलांची सुटका; मॅनेजर महिलेस पोलिस कोठडी - नवी मुंबई (प्रतिनिधी)...
महापौर, उपमहापौरांसमवेत माजी...
नवी मुंबईतील विविध विषयासंदर्भात चर्चा; विकासाचा वेग वृद्धिंगत...
महापालिकेला फसविणाऱ्या...
अर्थसंकल्पीय चर्चेत शिवसेना नगरसेवक शिवराम पाटीलांची मागणी नवी मुंबई...
लॉजिस्टिक पार्क नोड येथील...
नवी मुंबई (प्रतिनिधी) – सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागातर्फे...
