Breaking News

केडीएमसीच्या 'आय' प्रभागात नागरिकांची म्हशीसह धडक !

केडीएमसीच्या 'आय' प्रभागात नागरिकांची म्हशीसह धडक !

सरकारी गुरचरण जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी कल्याण (वार्ताहर) - कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील द्वारली पाडा येथील गुरचरण जमिनीवर भूमाफियांनी अतिक्रमण केले असून याबाबत महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा करून देखील हे अतिक्रमण हटत नसल्याने येथील तक्रारदार नागरिकांनी केडीएमसीच्या आय प्रभाग कार्यालयात काल म्हशीसह धडक दिली. गुरचरण जागेवरील अनधिकृत बांधकामांवर येत्या सात दिवसांत कारवाई करा, अन्यथा ५० गाई म्हशींसह आयुक्तांच्या बंगल्यावर धडक देण्याचा इशारा आंदोलनकर्ते सौरभ पांडे यांनी दिला. यावेळी स्थानिक तक्रारदार नागरिकांसह सामाजिक कार्यकर्ते सौरभ पांडे, सौरभ सिंह, विनोद तिवारी उपस्थित होते. द्वारली पाडा येथे मोठी गुरचरण जागा होती. याठिकाणी भूमाफियांनी भूमाफियांनी केडीएमसी अधिकाऱ्यांशी संगनमत करून या अनधिकृत चाळी उभारल्या आहेत. यामुळे गुरांना चरण्यासाठी जागाच शिल्लक राहिल्या नाहीत. याबाबत केडीएमसीकडे वारंवार पत्रव्यवहार करून देखील पालिका याबाबत कारवाई होत नसल्याने केडीएमसी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी केडीएमसीच्या आय प्रभागात चक्क म्हशीला आणण्यात आले. अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या व भूमाफियांना अभय देणाऱ्या प्रभाग क्षेत्र अधिकारी यांच्या विरोधात यावेळी आंदोलन करण्यात आले. येत्या सात दिवसांत या बांधकामांवर कारवाई न झाल्यास ५० गाई म्हशींसह केडीएमसी आयुक्तांच्या बंगल्यावर धडक देणार असल्याचा इशारा आंदोलनकर्ते सौरभ पांडे यांनी दिला आहे.


Most Popular News of this Week

नवी मुंबईतील सत्ताधारी...

नवी मुंबई (प्रतिनिधी) – राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे ओएसडी...

परिवहन समितीच्या सभेत...

एनएमएमटीच्या करारावरील चालक, वाहकांच्या पगारात भरघोस वाढड्रायव्हर,...

सीबीडीत मसाजच्या नावाखाली...

सात पिडित महिलांची सुटका; मॅनेजर महिलेस पोलिस कोठडी - नवी मुंबई (प्रतिनिधी)...

महापौर, उपमहापौरांसमवेत माजी...

नवी मुंबईतील विविध विषयासंदर्भात चर्चा; विकासाचा वेग वृद्धिंगत...

महापालिकेला फसविणाऱ्या...

अर्थसंकल्पीय चर्चेत शिवसेना नगरसेवक शिवराम पाटीलांची मागणी नवी मुंबई...

लॉजिस्टिक पार्क नोड येथील...

नवी मुंबई (प्रतिनिधी) – सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागातर्फे...