Breaking News

पर्यावरणाचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे

पर्यावरणाचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे

पर्यावरणाचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे

महापालिका आयुक्त अभिनव गोयल

कल्याण! पर्यावरणाचा बचाव करण्यासाठी, प्रदूषण कमी करण्यासाठी, जलसंवर्धनासाठी तसेच कचरा वर्गीकरणासाठी नागरिकांनी देखील पुढाकार घेऊन सहकार्य करावे असे प्रतिपादन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आज केले. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज कल्याण मधील उंबर्डे अमृत प्रकल्प येथे वृक्षारोपण करताना त्यांनी हे प्रतिपादन केले. याचवेळी त्यांनी उंबर्डे येथील घनकचरा प्रकल्प येथे मीयावाकी पद्धतीने वृक्षारोपण करण्याचा शुभारंभ केला ,महापालिका परीक्षेत्रात अन्य सहा ठिकाणी देखील अशी मियावाकी जंगले तयार केली जातील अशी माहिती आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली.


आज देशी प्रजातीच्या सुमारे 3000 झाडांची लागवड केली आहे, यापुढे लोकसहभागातून वृक्षारोपण केले जाईल ,त्याचप्रमाणे "एक विद्यार्थी एक झाड "ही संकल्पना- ही ऍक्टिव्हिटी दर महिन्यात राबविण्यात येईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. शासनाच्या निर्देशानुसार प्लास्टिक मुक्त शहर हे अभियानही आपल्याला राबवायचे आहे असेही आवाहन आयुक्त यांनी यावेळी केले.

 या वृक्षारोपण अभियानात आमदार सुलभा गायकवाड तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी, एम एम आर डी ए चे अधीक्षक अभियंता, मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव, डॉ. प्रशांत पाटील उद्यान अधीक्षक अनिल तामोरे तसेच इतर अधिकारी कर्मचारी, विद्यार्थी यांनी अतिशय उत्साहात सहभाग घेतला.


Most Popular News of this Week

नवी मुंबईतील सत्ताधारी...

नवी मुंबई (प्रतिनिधी) – राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे ओएसडी...

परिवहन समितीच्या सभेत...

एनएमएमटीच्या करारावरील चालक, वाहकांच्या पगारात भरघोस वाढड्रायव्हर,...

सीबीडीत मसाजच्या नावाखाली...

सात पिडित महिलांची सुटका; मॅनेजर महिलेस पोलिस कोठडी - नवी मुंबई (प्रतिनिधी)...

महापौर, उपमहापौरांसमवेत माजी...

नवी मुंबईतील विविध विषयासंदर्भात चर्चा; विकासाचा वेग वृद्धिंगत...

महापालिकेला फसविणाऱ्या...

अर्थसंकल्पीय चर्चेत शिवसेना नगरसेवक शिवराम पाटीलांची मागणी नवी मुंबई...

लॉजिस्टिक पार्क नोड येथील...

नवी मुंबई (प्रतिनिधी) – सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागातर्फे...