संयम पाळा, एड्स टाळा : कल्याणमध्ये केडीएमसीतर्फे रॅलीद्वारे एचआयव्ही एड्स बाबत जनजागृती
संयम पाळा, एड्स टाळा : कल्याणमध्ये केडीएमसीतर्फे रॅलीद्वारे एचआयव्ही एड्स बाबत जनजागृती
कल्याण (वार्ताहर) - जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून काल कल्याण डोंबिवली महापालिकेतील वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत या घातक रोगाला नियंत्रणात आणण्यासाठी, अडथळ्यांवर मात करू, एकजुटीने एचआयव्ही एड्सला लढा देऊ, नवपरिवर्तन घडवू ही तीन उद्धिष्ट समोर ठेवून, कृष्णा कुमावत यांच्या नेतृत्वाखाली आयसीटीसी रुक्मिणीबाई रुग्णालय, कल्याण आणि अचिव्हर्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने एचआयव्ही अर्थात एड्स जनजागृती रॅलीचे आयोजन सोमवारी केले होते. कल्याण डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड तसेच उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी या एड्स रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रॅलीचे उदघाटन केले. याप्रसंगी प्र वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रज्ञा टिके, रुक्मिणीबाई रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पुरुषोत्तम टिके, एड्स विभागाच्या प्रमुख डॉ. सुलक्षणा त्रिभुवन, वसंत व्हॅली प्रसूतीगृहाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सपना रामोळे, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. पौर्णिमा ढाके, डॉ.महेश भिवंडीकर, एआरटी विभागाचे प्रमुख डॉ.राजू लवंगारे व डॉ. अशोक भिडे उपस्थित होते. कृष्णा कुमावत यांनी जागतिक एडस दिनाबाबत प्रस्तावना केली व सर्वांनी एड्सविषयी शपथ घेतली. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी या प्रसंगी उपस्थिताना मार्गदर्शन करताना संसर्गातून कसे वाचवता येईल यासाठी एचआयव्ही एड्स या आजारा संबंधी जनजागृती फार गरजेची असल्याचे नमूद केले. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रज्ञा टिके यांनी एचआयव्ही एड्स प्रतिबंधात्मक आणि उपचाराबाबत माहिती दिली. सदरची ही रॅली बाई रुक्मिणीबाई रुग्णालय येथून सुरू होऊन पुष्पराज हॉटेल - छत्रपती शिवाजी महाराज चौक - सहजानंद चौक - संतोषी माता मंदिर रोड मार्ग अचिव्हर्स कॉलेज येथे सांगता झाली. रॅलीमध्ये संयम पाळा, एड्स टाळा, श्री शक्तीचा एकच नारा -एचआयव्ही एड्सला हद्दपार करा अशा घोषणा देण्यात आल्या. या रॅलीत जवळपास ३०० एनएसएस रेड रिबन क्लबचे युवक युवती तसेच इतर स्टाफ मिळून ३५० व्यक्तींनी सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
Most Popular News of this Week
बेलापूर येथील प्रस्तावीत...
खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...
लॉजिस्टिक पार्क नोडमधील...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...
शासकीय वनजमीनीचा वन...
वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...
कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...
नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...
परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...
ठाणे मनपा सभागृहनेतेपदी...
महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केली घोषणाठाणे (वार्ताहर)- ठाणे...
