Breaking News

नवी मुंबईत १०७ हुतात्म्यांना दीप प्रज्वलनाव्दारे मानवंदना!

नवी मुंबईत १०७ हुतात्म्यांना दीप प्रज्वलनाव्दारे मानवंदना!

नवी मुंबई (प्रतिनिधी)- शिव तुतारी प्रतिष्ठान नवी मुंबई आणि मराठी, साहित्य, संस्कृती आणि कला मंडळ वाशी, यांच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मा दिनाच्या पूर्वसंध्येला साहित्य मंदिर वाशी येथे दि.२० नोव्हेंबर रोजी संयुक्त महाराष्ट्र चळवळ जिंकून देखील हरलेली लढाई या विषयावर परिसंवाद आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे संयुक्त महाराष्ट्र आंदोलन दरम्यान महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी लढताना पोलीस गोळीबारात शहीद झालेल्या १०७ हुतात्म्यांना यावेळी नवी मुंबईतील १३२ सेवाभावी संस्था यांच्यावतीने एक, एक दीप प्रज्वलित करून वंदनाव्दारे मानवंदना देण्यात आली. अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमास उस्फूर्तपणे उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या विविध मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून हरवत चाललेला मराठी बाणा टिकवून ठेवण्याचे आवाहन केले.  या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान लेखक व ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर यांनी भूषविले तर मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख आणि शिव स्वराज्य मराठी लोक चळवळचे अध्यक्ष संजय यादवराव यांनी या परिसंवादात आपले मत व्यक्त केले. भव्य स्वरूपात आणि शानदारपणे पार पडलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात नादवेणू अकॅडमी, ऐरोली यांचे प्रमुख आकाश सूर्यवंशी यांनी आपल्या १५ बासरी वादक यांच्यासह संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील वीर रसातील गाणी गाऊन, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. प्रसिद्ध शाहीर मनोहर गोलाबरे यांनी आपल्या सहकारी यांच्यासह, अण्णा भाऊ साठे यांची, माझी मैना गावाकडे राहिली ही छक्कड सादर करून काळजाचा ठाव घेतला. गोवर्धन देशमुख यांनी आपल्या भाषणात परप्रांतीय लोकांकडून होणाऱ्या सांस्कृतिक, भौगलिक आणि व्यवसाय व नोकरी यांच्यावर अतिक्रमण कसे होत असते, या बाबत सडेतोड भूमिका घेत आपले मत व्यक्त केले. आपण आपल्या भाषेत संवाद साधत असताना, १०७ हुतात्मा यांच्या बलिदानाचा विसर पडू देऊ नये, फुले, शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वप्नातील रामराज्य निर्माण करण्यासाठी सर्वांनी संघटित होऊन, कार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन केले. संजय यादवराव यांनी मराठी माणसाने आता उद्योग आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी धडपड केली पाहिजे असे आवाहन केले. मराठी माणसे आता मुंबईत संख्येने वजा होत आहेत अशी खंत व्यक्त करतानाच, परप्रांतीय यांनी, कोकणात देखील हजारो एकर जमीन बळकावली असून, या बाबत गंभीर परिणाम आपणास भोगावे लागत आहेत, लागतील असा इशाराही त्यांनी दिला. शिव तुतारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी प्रास्ताविकात , प्रतिष्ठानचे कार्यकर्ते १३२ संस्था यांच्या पर्यंत स्वतः पोहचून हा कार्यक्रम करत असल्याचे सांगितले. सुभाष कुलकर्णी यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन शंकर गोपाळे आणि नारायण लांडगे पाटील यांनी केले, जय,जय महाराष्ट्र माझा या राज्य गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी निलेश पालेकर, रवींद्र औटी, विलास समेळ, रमेश संकपाळ, प्रा.नाना पाटील, मोरे, कल्पना देशमुख, ज्योती माळी, मनिषा पाटील, रुद्राक्ष पातारे आणि इतर मान्यवर यांनी विशेष. मेहनत घेतली.

परप्रांतीयांना कागदपत्रे उपलब्ध करून देणारे आपलेच मराठी बांधव -ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर

कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर यांनी आपल्या मार्गदर्शनात, आकडेवारी देत मराठी भाषा, मराठी साहित्य कशी कमी होत आहे ही गंभीर बाब नमूद केली. विविध सरकारी दवाखाने, शाळा यांचा परप्रांतीय कसा अधिक संख्येने वापर, उपभोग घेत असल्याचे सखोलपणे स्पष्ट करुन, परप्रांतीय माणसांना आधारकार्ड, रेशन कार्ड आणि वास्तव्याचा पुरावा देणारे सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी मराठी आहेत. त्यांना सदर कागदपत्र उपलब्ध करून देणारे आपलेच मराठी बांधव असल्याचे सांगत खेद यक्त केला.


Most Popular News of this Week

बेलापूर येथील प्रस्तावीत...

खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...

लॉजिस्टिक पार्क नोडमधील...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...

शासकीय वनजमीनीचा वन...

वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...

कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...

नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...

परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...

नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...

ठाणे मनपा सभागृहनेतेपदी...

महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केली घोषणाठाणे (वार्ताहर)- ठाणे...