नेरूळ येथील छत्रपती शिवाजी महाराजा सिहासनारुठ पुतळ्याचे अनावरण...!
नेरूळ येथील छत्रपती शिवाजी महाराजा सिहासनारुठ पुतळ्याचे अनावरण...!
पुतळा आंदोलना प्रकरणी अमित ठाकरेंवरील गुन्हे मागे घेण्याची ना.गणेश नाईक यांची सुचना
नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिकेच्या वतीने से.१ नेरुळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनारुढ पुतळ्याचे अनावरण तसेच से.१५ नेरुळ येथील मासाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयात मायक्रोबायलॉजी प्रयोग शाळेचा शुभारंभ राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्याहस्ते, आ.मंदा म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, माजी खा.डॉ.संजीव नाईक, शहर अभियंता शिरीष आरदवाड, वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, माजी महापौर जयवंत सुतार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, नवी मुंबई महापालिकेने नेरुळ से-१ येथे उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण रखडले होते. यावरून मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत, पाच दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या पुतळयाचे अनावरण रविवारी केले होते. याप्रकरणी मनसे नेते अमित ठाकरे यांचेसह मनसे सैनिकांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत. यासंदर्भात प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका स्पष्ट करताना ना.गणेश नाईक यांनी, मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्यावरील दाखल गुन्हे मागे घेण्याची सूचना केली.
यावेळी वनमंत्री गणेश नाईक पुढे म्हणाले की, माजी महापौर जयवंत सुतार
यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या चौकात बसवण्यात आला आहे.
पालिका आयुक्तांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते याचे उदघाटन करावे अशी
अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र त्याचा योग जुळून आला नाही. पुतळ्याचे उद्घाटन
चार-पाच महिने रखडल्याने अमित ठाकरे यांनी आंदोलन केले होते. छत्रपती शिवाजी
महाराजांवर प्रेम करणारे सर्व जाती, पंत आणि राजकीय पक्षांचे पदाधिकारी होते. अमित
ठाकरे यांची पुतळयाचे उदघाटन करण्यामागची भूमिका ही कायदा तोडावा अशी नव्हती.
प्रशासनाला जागृत करण्यासाठी त्यांनी ही भूमिका घेतली. त्यामुळे त्यांच्यावर दाखल
केलेल्या गुन्ह्याशी मी सहमत नसल्याचे नामदार गणेश नाईक यांनी स्पष्ट करीत
नैसर्गिकरीत्या झालेल्या कृत्यानंतर त्याच्यावर महापालिकेकडून आणि पोलिसांकडून
दाखल केलेले फौजदारी गुन्हे मागे घ्यावेत, अशी वैयक्तिक भूमिका असल्याचे गणेश नाईक
म्हणाले.
Most Popular News of this Week
नवी मुंबईतील सत्ताधारी...
नवी मुंबई (प्रतिनिधी) – राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे ओएसडी...
परिवहन समितीच्या सभेत...
एनएमएमटीच्या करारावरील चालक, वाहकांच्या पगारात भरघोस वाढड्रायव्हर,...
सीबीडीत मसाजच्या नावाखाली...
सात पिडित महिलांची सुटका; मॅनेजर महिलेस पोलिस कोठडी - नवी मुंबई (प्रतिनिधी)...
महापौर, उपमहापौरांसमवेत माजी...
नवी मुंबईतील विविध विषयासंदर्भात चर्चा; विकासाचा वेग वृद्धिंगत...
महापालिकेला फसविणाऱ्या...
अर्थसंकल्पीय चर्चेत शिवसेना नगरसेवक शिवराम पाटीलांची मागणी नवी मुंबई...
लॉजिस्टिक पार्क नोड येथील...
नवी मुंबई (प्रतिनिधी) – सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागातर्फे...
