Breaking News

घणसोली नोडमधील अनधिकृत बांधकामांवर सिडकोचा हातोडा

घणसोली नोडमधील अनधिकृत बांधकामांवर सिडकोचा हातोडा

नवी मुंबई (प्रतिनिधी)- सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाईची मोहिम तीव्र केली असून, गुरुवार दि.१६ एप्रिल व शुक्रवारी दि. १७ एप्रिल रोजी घणसोली नोडमध्ये हाती घेतलेल्या मोहिमेत अनधिकृत बाधंकामांवर हातोड मारून ती हटविण्यात आली. दरम्यान, सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या निर्देशानुसार करण्यात आलेल्या सलगच्या या कारवाईमुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. सिडकोच्या या कारवाईत, शुक्रवार दि १७ एप्रिल २०२६ रोजी घणसोली नोड मधील से- २७ मौजे गोठीवली येथील उदय पाटील यांच्या अनधिकृत बांधकामावर निष्कासन मोहीम राबवून सदरचे अनधिकृत बांधकाम हटविण्यात आले. सदर कारवाईसाठी १ पोकलेन ६ लेबर, प्रत्येकी एक सुपरवायझर, फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर असा लवाजमा तैनात ठेवण्यात आला होता. तर दुसऱ्याच दिवशी घणसोली नोडमधील से-२१ येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत, घणसोली नोड मधील से - २१ येथील तानाजी सावंत यांच्या अनधिकृत बांधकामावर निष्कासन मोहीम राबवून ते हटविण्यात आले. सदर कारवाईसाठी १ पोकलेन ६ लेबर १ सुपरवायझर १ फोटोग्राफर व १ व्हिडिओग्राफर उपस्थित होते. सदरचे अनधिकृत बांधकाम पूर्णतः निष्कासित करण्यात आले आहे.


Most Popular News of this Week

नवी मुंबईतील सत्ताधारी...

नवी मुंबई (प्रतिनिधी) – राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे ओएसडी...

परिवहन समितीच्या सभेत...

एनएमएमटीच्या करारावरील चालक, वाहकांच्या पगारात भरघोस वाढड्रायव्हर,...

सीबीडीत मसाजच्या नावाखाली...

सात पिडित महिलांची सुटका; मॅनेजर महिलेस पोलिस कोठडी - नवी मुंबई (प्रतिनिधी)...

महापौर, उपमहापौरांसमवेत माजी...

नवी मुंबईतील विविध विषयासंदर्भात चर्चा; विकासाचा वेग वृद्धिंगत...

लॉजिस्टिक पार्क नोड येथील...

नवी मुंबई (प्रतिनिधी) – सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागातर्फे...

नवी मुंबईतील प्रलंबीत...

प्रस्तावित सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल प्रकल्पास गती देण्याचे...