विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व नागरिकांसाठी वाचनालय सुविधा सुरु करा!

विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका व नागरिकांसाठी वाचनालय सुविधा सुरु करा!

मनसे नगरसेवक अभिजीत देसाईचे आयुक्तांना साकडे

बेलापूर (वार्ताहर) - प्रभाग क्रं.२२ ड येथील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पोषक वातावरण मिळावे या हेतुने अभ्यासिका व नागरिकांमध्ये वाचनाची आवड वृध्दींगत होण्यासाठी वाचनालयाची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी आग्रही मागणी मनसेचे नगरसेवक अभिजीत देसाई यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली आहे. या मागणीसंदर्भात मनसेचे नगरसेवक अभिजीत देसाई यांनी महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांची नुकतीच भेट घेवून त्यांना याबाबतचे निवेदन सादर केले आहे. प्रभागात लहान घरांमध्ये राहणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना शांततेत अभ्यास करण्यासाठी जागेची कमतरता भासते. ही अडचण ओळखून नगरसेवक अभिजीत देसाई यांनी प्रभागातील गणेश मैदान, से-२३, जुईनगर येथे सुसज़्ञ अभ्यासिका महापालिकेने सुरु करावी तसेच सानपाडा से-११ येथे वाचनालय आणि अभ्यासिका तसेच नेरूळ सेक्टर ४ (शाळा क्र.१०२) विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सुविधांसह स्वतंत्र अभ्यासिका सुरू करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्यासाठी आणि त्यांना अभ्यासासाठी पोषक वातावरण मिळावे यासाठी आपण कटिबद्ध असून लवकरच या प्रक्रियेला गती मिळेल, असा विश्वास नगरसेवक अभिजीत देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.



Most Popular News of this Week

नवी मुंबईतील सत्ताधारी...

नवी मुंबई (प्रतिनिधी) – राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे ओएसडी...

परिवहन समितीच्या सभेत...

एनएमएमटीच्या करारावरील चालक, वाहकांच्या पगारात भरघोस वाढड्रायव्हर,...

सीबीडीत मसाजच्या नावाखाली...

सात पिडित महिलांची सुटका; मॅनेजर महिलेस पोलिस कोठडी - नवी मुंबई (प्रतिनिधी)...

महापौर, उपमहापौरांसमवेत माजी...

नवी मुंबईतील विविध विषयासंदर्भात चर्चा; विकासाचा वेग वृद्धिंगत...

लॉजिस्टिक पार्क नोड येथील...

नवी मुंबई (प्रतिनिधी) – सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागातर्फे...

नवी मुंबईतील प्रलंबीत...

प्रस्तावित सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल प्रकल्पास गती देण्याचे...