Breaking News

नवी मुंबई पोलीसांकडून १८ कोटी ६३ लाखाचे अंमली पदार्थ नष्ट...

नवी मुंबई पोलीसांकडून १८ कोटी ६३ लाखाचे अंमली पदार्थ नष्ट...

ड्रग्ज विक्री करणारे १५२९ आफ्रिकन हद्दपार तर ९११ ब्लॅकलिस्ट

नवी मुंबई (प्रतिनिधी) - अंमली पदार्थ सेवन आणि विक्री करणाऱ्यांविरोधात नवी मुंबई पोलिसांकडून सातत्याने कारवाई करण्यात येत असून, होळी सणाच्या मुहुर्तावर समाजातील वाईट प्रवृत्तींचे निर्मूलन करण्याच्या उद्देशाने ५५ गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला १८ कोटी ६३ लाख ३४ हजार २६५ रुपयांचे किंमतीचे अंमली पदार्थ नवी मुंबई पोलिसांकडून तळोजा, भागात नष्ट केला आहे. नशा मुक्‍त नवी मुंबई अभियानांतर्गत अंमली पदार्थाविरोधात सातत्यपूर्ण, समन्वयित व कठोर कारवाई करत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने एक महत्त्वपर्ण पाऊल उचलले आहे. नशा मुक्‍त नवी मुंबई अभियान या कार्यकमाअंतर्गत नवी मुंबई पोलीस आयुक्‍ताल्याकडुन २६ सप्टेंबर २०२५ रोजी पर्यंत ११४ गुन्हयांमधील एकुण ३८ कोटी ४५ लाख रुपये किंमतीचे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आला होता. त्याच अभियानाचा पुढील भाग म्हणून काल होळी सणाच्या मुहुर्तावर समाजातील वाईट प्रवृत्तींचे निर्मूलन करण्याच्या उद्देशाने ५५ गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला १८ कोटी ६३ लाख ३४ हजार २६५ रुपयांचे किंमतीचे अंमली पदार्थ शासन मान्य मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी, तळोजा, ता.पनवेल, जि.रायगड या ठिकाणी कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून नवी मुंबईचे पोलीस आयुक्‍त मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्‍त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, दीपक साकोरे, पोलीस उप आयुक्‍त, परिमंडळ ३, प्रशांत मोहिते, पोलीस उप आयुक्‍त, गुन्हे शाखा सचिन गुंजाळ, सहा.पोलीस आयुक्‍त, खारघर विभाग विक्रम कदम, वपोनि, अंपवि कक्ष, संदीप निगडे यांचे उपस्थितीत नष्ट करण्यात आला आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्‍तालयामध्ये मागील 03 वर्षामध्ये बेकायदेशीररित्या वास्तव्यास राहून व ड्रग्जची विक्री करणाऱ्या आफ्रिकन नागरिकांविरुध्द कारवाई करून एकुण १५२९ नागरिकांना हद्दपार करण्यात आले असुन ९११ आफिकन नागरिकांना ब्लॅकलिस्ट करण्यात आले आहे. वारंवार अंमली पदार्थ विक्रीत सहभागी आढळलेल्या आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच पंजाब राज्यातुन नवी मुंबई येथे येवुन हॉटेल, लॉज, पीजी येथे वास्तव्यास राहून ट्रक़ व रेल्वेमार्ग हेरॉईन, अफिम यासारख्या अंमली पदार्थाची वाहतुक करून मोठया प्रमाणात विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करुन 0६ गुन्हे दाखल केले आहेत. तसेच एकुण ३३ आरोपींना अटक केली असून या आरोपींच्या ताब्यातून 0४ कोटी २० लाख रूपये किंमतीचे हेरॉईन, अफिम, मेफेड्रॅन व कोडाईन बॉटल असा अंमल पदार्थ हस्तगत केला आहे. सदर गुन्हयातील मुख्य सूत्रधार आरोपी साहीबसिंग जोगिंदरसिंग उर्फ सबा, रा.अमृतसर, पंजाब यास पंजाब येथून अटक केली आहे. अंमली पदार्थाविरोधातील कारवाई अधिक प्रभावी, जलद व स्थानिक पातळीवर परिणामकारक व्हावी यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र अन्टी नार्कोटिक स्क्कॉड' (एएनएस) स्थापन करण्यात आलेले आहेत. स्थानिक माहिती संकलन व गुप्त बातमीदार जाळे बळकट करणे, शाळा, महाविद्यालये, हॉटेळ, लॉज, पब, बार व संवेदनशील भागांमध्ये नियमित तपासणी व गस्त, नव्याने उध्दभवणाऱ्या ड्रग टेंडर्सवर लक्ष ठेवणे व तात्काळ कारवाई, एनडीपीएस कायद्यांतर्गत प्रकरणांची शास्त्रशुद्ध तपासणी व दोषारोपपत्र सादर करणे ही या स्क्कॉडची प्रमुख वैशिष्टये आहेत.शासनाच्या धोरणानुसार अंमली पदार्थविरोधातीळ कारवाई अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्‍तालयामध्ये नशा मुक्‍त नवी मुंबई" अभियानाची सुरूवात करण्यात आली आहे. सदर अभियानाच्या अनुषंगाने शहरातील शाळा, कॉलेज, सोसायटया व सार्वजनिक ठिकाणी व्यापक जनजागृती कार्यकम आयोजित करण्यात येत आहे. नागरिकांकडुन अंमली पदार्थाविषयी माहिती मिळावी यासाठी ८८२८-११२-११२ हा हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आलेला आहे. नागरिक कोणतीही माहिती पूर्णपणे गोपनीय (गुप्त) स्वरूपात देऊ शकतात. माहिती देणाऱ्या व्यक्‍तीची ओळख गोपनीय राखण्यात येईल, याची हमी देण्यात आली आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्‍तालयामार्फत अंमली पदार्थाविरोधातील कारवाई भविष्यातही अधिक तीव्र, कायदेशीर व समन्वयित पद्धतीने सुरू ठेवण्यात येणार असून, नागरिकांनी निर्भयपणे व गोपनीयतेने माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन नवी मुंबई पोलिसांकडून करण्यात येत आहे.


Most Popular News of this Week

तुर्भेगावात एक गाव एक होळी...

तुर्भे (वार्ताहर) - तुर्भेगवात एक गाव होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला....

अर्थसंकल्पीय विशेष सभेला...

उरण नगराध्यक्षांची विशेष अधिकाराचा वापर करून सभागृहात ९८ कोटींच्या...

विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका...

मनसे नगरसेवक अभिजीत देसाईचे आयुक्तांना साकडेबेलापूर (वार्ताहर) - प्रभाग...

आ.मंदा म्हात्रे यांच्या...

बेलापूर (वार्ताहर) - आ.मंदा म्हात्रे यांनी असंख्य महिलांसह होळी व...

कळंबोलीतील अनधिकृत...

नोटीसा लावून बेवारस वाहने जप्तपनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका आयुक्त...

कचरा व्यवस्थापन नियमांचे...

कल्याण (वार्ताहर) - कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...