ठाणे, नवी मुंबईसह उरण-पनवेलमध्ये होळी व धुलीवडीचा सण उत्साहात साजरा
ठाणे, नवी मुंबईसह उरण-पनवेलमध्ये होळी व धुलीवडीचा सण उत्साहात साजरा
नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबईसह ठाणे, उरण, पनवेलमध्ये प्रचंड उत्साहात पारंपरिक पद्धतीने सोमवारी होळीचा सण व मंगळवारी धुलीवंदन सण साजरा करण्यात आला. सर्वत्र धुळवडीचा उत्साह शिगेला पोहोचला असल्याचे चित्र दिसत होते. तरुणाईमध्ये यानिमित्ताने विशेष जल्लोष होता. राजकीय नेत्यांनीही कार्यकर्त्यांसोबत धुळवड साजरी केली. धुलीवंदन हा सण मंगळवारी आला असला तरी चिकन, मटण दुकानात ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे नवी मुंबईत हा सण उत्साहात पार पडला.
नवी मुंबईत प्रचंड उत्साहात पारंपरिक पद्धतीने सोमवारी होळीचा सण व मंगळवारी धुलीवंदन सण साजरा करण्यात आला. पाण्याचा सडा टाकून त्यावर आकर्षक रांगोळी रेखाटून सजवलेली होळी. भक्तिभावनेने केलेले तिचे विधिवत पारंपारिक पूजून.. डफ वाजवत होळी रे होळी पुरणाची पोळी असे ओरडत त्या भोवती नाचणाऱ्या महिला तसेच पुरुष यांचा जल्लोष तसेच आमच्या दाराशी हाय शिमगा असे गावठाण भागात होळीनिमित्त वाजणारे गाणे सर्वाचेच लक्ष वेधून घेत होते. तर शहरी भागात रंग बरसे भीगी चुनर वाली रंग बरसे... हे हिंदी गाणे ठिकठिकाणी ऐकावयास मिळण्यासह त्यावर तरूणाईने चांगळाच ठेका धरल्याचे चित्र पहावयास मिळत होते. विशेष म्हणजे धुलीवंदन सणाच्या दिवशी ग्रहण असले तरी बहूतांश ठिकाणी तरुणाईने धुळवड धडाक्यात साजरी केली. चांद्यापासून बांद्यापासून रंग बरसेचा उत्साह आणि जोश पाहायला मिळाला. सकाळपासूनच जिकडे पाहावे तिकडे प्रत्येकजण रंगाने भरलेले दिसत होते. बच्चे कंपनी आणि महिलांप्रमाणेच थोरामोठ्यांपासून राजकारणी या सणाचा मनसोक्त आनंद लुटताना दिसत होते.
विशेषकरून नवी मुंबईतील कोळी वाड्यात पारंपारिक होलिकोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. होळी सणानिमित्त गावागावांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.गल्लोगल्लीत रंगाची उधळण होत असल्याचे पहावयास मिळाले. एकविसाव्या शतकातील आधुनिक शहर म्हणून नवी मुंबईचा उल्लेख केला जातो. आगरी कोळी बांधवांनी आजच्या आधुनिक युगातही आपली संस्कृती टिकविली असल्याचे चित्र गावठाण भागात साजरा करण्यात आलेल्या होळी व धुलीवंदनाच्या उत्सवावर दिसून आले. रबाळेगाव, गोठिवली, बेलापूर, दिवाळे, सारसोळे, नेरूळ, घणसोली, दिवा व इतर विविध ठिकणच्या कोळी बांधवांकडून होलिकोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. रबाळेगाव कोळीवाडा येथे सोमवारी पारंपारिक पध्दतीने होळीची पूजा करण्यात आली. यावेळी महिलांसह पुरुष मंडळीनेही होळी सभोवताली फेर धरला होता. होळीनिमित्त आयोजित वेशभूषा स्पर्धेत तरूणाईने विविध प्रकारची वेशभूषा करून आपले लक्ष वेधून घेतले होते. विशेषकरून होळीनिमित्त आयोजित विवाह सोहळ्याने सर्वांच्या डोळ्याचे पारणे फेडले. नवी मुंबईतील चौकाचौकांत भव्य होळी पेटवल्या गेल्या होत्या. अनेक ठिकाणी होळीभोवती सप्तरंगी रांगोळया रेखाटण्यात आल्या होत्या. तर आयुष्यातील मोलाचे क्षण मोबाइलच्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्यात आघाडीवर असणाऱ्या तरुणाईने होळीच्या सणालादेखील ही संधी सोडली नाही. विशेषकरून तरूणाईने होळीच्या रंगात मनसोक्त रंगत होळी साजरी केली. तसेच विविध सोसायटी परिसरात धुलीवडीचा आनंद नागरिकांनी लुटला.
नवी मुंबईसह उरण परिसरात दरवर्षीप्रमाणेच यंदा धुळवड सण मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पारंपरिक पद्धतीने होळीचे पूजनही विधिवत करण्यात आले; तर पर्यावरणाचा जागर करत रंगपंचमीला पाण्याचा वापरही कमी प्रमाणात झाल्याचे दिसून आले. उरण तालुक्यातील समुद्रकिनारी वसलेल्या करंजा,मोरा,दिघोडे कोळीवाड्यात गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेला होळी सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी तरुणाईच्या आनंदाला उधाण आले होते. होळीच्या दिवशी नवविवाहित मानाचे जोडेही उपस्थित होते. त्यांनी विधिवत होळी भोवती प्रदक्षिणा घातली व होळी मातेकडे पुढील वैवाहिक आयुष्य सुखा-समाधानात जावे म्हणून साकडे घातले. कोळी बांधवांनी नटून-थटून कोळी बँडच्या तालावर पारंपरिक नृत्य केले. तालुक्यातील गावागावांत पारंपरिक पद्धतीने मनोरा रचून होळीची विधिवत पूजा करण्यात आली.सोनारी गावात एक गाव एक होळी हा सण साजरा करण्यात आला तसेच धुळवड सणावर खग्रास चंद्रप्रहणाचे सावट असताना ही अबालवृद्धानी विविध पुर्वक पूजा अर्चा करत ढोलताशाच्या गजरात रंगांची उधळण करत मोठ्या जल्लोष एकमेकांना रंग लावून शुभेच्छा दिल्या.
Most Popular News of this Week
तुर्भेगावात एक गाव एक होळी...
तुर्भे (वार्ताहर) - तुर्भेगवात एक गाव होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला....
अर्थसंकल्पीय विशेष सभेला...
उरण नगराध्यक्षांची विशेष अधिकाराचा वापर करून सभागृहात ९८ कोटींच्या...
विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका...
मनसे नगरसेवक अभिजीत देसाईचे आयुक्तांना साकडेबेलापूर (वार्ताहर) - प्रभाग...
आ.मंदा म्हात्रे यांच्या...
बेलापूर (वार्ताहर) - आ.मंदा म्हात्रे यांनी असंख्य महिलांसह होळी व...
कळंबोलीतील अनधिकृत...
नोटीसा लावून बेवारस वाहने जप्तपनवेल (वार्ताहर) - पनवेल महापालिका आयुक्त...
कचरा व्यवस्थापन नियमांचे...
कल्याण (वार्ताहर) - कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा...
