भिवंडी निजामपूर मनपा महापौरपदी नारायण चौधरी, उप महापौरपदी मोमीन अब्दुल तारिक बारी यांची निवड

भिवंडी निजामपूर मनपा महापौरपदी नारायण चौधरी, उप महापौरपदी मोमीन अब्दुल तारिक बारी यांची निवड

भिवंडी (वार्ताहर) - भिवंडी निजामपूर शहर महापालिकेच्या महापौर व उप महापौर पदाची निवडणूक दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी पिठासिन अधिकारी तथा ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली स्व.विलासराव देशमुख सभागृह येथे संपन्न झाली. या प्रसंगी महानगरपालिका आयुक्त अनमोल सागर तसेच मनपाचे नगरसचिव अजय पाटील यांच्या उपस्थितीत सदरची निवडणूक पार पडली. भिवंडी महापालिकेच्या महापौर पदासाठी १० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते, त्यातील ६ उमेदवारांनी सदर दिवशी आपले अर्ज मागे घेतले. उर्वरित ४ अर्जांपैकी २ अर्ज एकाच उमेदवाराचे होते. अंतिम उमेदवार नारायण चौधरी, विलास पाटील, स्नेहा पाटील यांच्यामध्ये निवडणूक घेण्यात आली, यामध्ये नारायण चौधरी यांना ४८ मते, विलास पाटील यांना २५ मते तर स्नेह पाटील यांना १६ मते पडली. त्यामुळे नारायण चौधरी यांची भिवंडी निजामपूर शहर महापालिकेच्या महापौर पदी निवड झाल्याचे पिठासिन अधिकारी डॉ. श्रीकृण पांचाळ (जिल्हाधिकारी ठाणे) यांनी घोषित केले.

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या उप- महापौर पदासाठी 0७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते, त्यातील 0२ उमेदवारांनी सदर दिवशी आपले अर्ज मागे घेतले,तर ०१ अर्ज अवैध झाला. उर्वरित ४ अर्जांपैकी २ अर्ज एकाच उमेदवाराचे होते, अंतिम उमेदवार जावेद दळवी, मोमीन अब्दुल तारिक बारी, सुहास नकाते यांच्यामध्ये निवडणूक घेण्यात आली, यामध्ये जावेद दळवी यांना २५ मते, मोमीन अब्दुल तारिक बारी यांना ४३ मते तर सुहास नकाते यांना २१ मते पडली. त्यामुळे मोमीन अब्दुल तारिक बारी यांचा उपमहापौरपदाचा मार्ग मोकळा होवून त्यांची भिवंडी निजामपूर शहर महापालिकेच्या उप-महापौर पदी निवड झाली. याबाबतची घोषणा पिठासिन अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केली. तद्रंतर जिल्हाधिकारी तथा पिठासिन अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी विजयी महापौर व उप-महापौर यांना पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले.


Most Popular News of this Week

परिवहन समितीच्या सभेत...

एनएमएमटीच्या करारावरील चालक, वाहकांच्या पगारात भरघोस वाढड्रायव्हर,...

सीबीडीत मसाजच्या नावाखाली...

सात पिडित महिलांची सुटका; मॅनेजर महिलेस पोलिस कोठडी - नवी मुंबई (प्रतिनिधी)...

लॉजिस्टिक पार्क नोड येथील...

नवी मुंबई (प्रतिनिधी) – सिडकोच्या अनधिकृत बांधकामे नवी मुंबई विभागातर्फे...

११ जणांच्या मृत्यूनंतर...

कल्याण (वार्ताहर) - कल्याण मुरबाड रोडवरील रायते येथे सोमवारी झालेल्या भीषण...

नवी मुंबईतील रस्ते चकाचक,...

| अभियंते फिल्डवर की फक्त एसी केबिनमध्ये ? | पालिकेच्या कारभारावर सजग नागरिक...

खारघरमध्ये डेब्रीज खाली...

खारघर (प्रतिनिधी)- सिडकोने संपादित केलेल्या जमिनींवर तसेच संपादिक करण्यात...