नवी मुंबई महापालिका स्थायी समितीवर भाजपच्या १०, शिवसेनेच्या ६ सदस्यांची निवड
नवी मुंबई महापालिका स्थायी समितीवर भाजपच्या १०, शिवसेनेच्या ६ सदस्यांची निवड
नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेची पहिली महासभा काल महापालिका सभागृहात पडली. स्थायी समितीवर १६ सदस्यांची निवड करण्यात आली. या सदस्यांपैकी एकाची स्थायी समिती अध्यक्षपदी निवड होईल. महापालिकेत महापौर व उपमहापौर यांच्यानंतर विरोधी पक्षनेता, सभागृह नेता व स्थायी समिती सभापती या पदांना विशेष महत्व असते. विशेषकरून स्थायी समितीस महापालिकेची तिजोरी संबोधले जात असल्याने काल निवड झालेल्या १६ सदस्यांमध्ये भाजपच्या दहा तर शिवसेना (शिंदे) सहा सदस्यांचा समावेश आहे.स्थायी समितीवर निवड झालेल्या भाजपच्या सदस्यांमध्ये सागर नाईक यांच्यासह सुधाकर सोनवणे, अशोक पाटील, प्रदीप गवस, अंजली वाळुंज, जयवंत सुतार, शशिकांत भोईर, स्वाती गुरखे, संदिप म्हात्रे व सुरेश शेट्टी अशा दहा नगरसेवकांचा समावेश आहे. तर शिवसेनेतर्फे स्थायी समिती सदस्यपदासाठी निवड झालेल्या नगरसेवकांमध्ये मंदाकिनी म्हात्रे यांच्यासह सुरेश कुलकर्णी, सरोज पाटील, दीपाली सकपाळ, आकाश मढवी व अनिता पाटील यांच्या नावाचा समावेश आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या पार पडलेल्या निवडणुकीच्या निकालात भाजपचे ६५ उमेदवार निवडून आल्याने महापालिका सभागृहात भाजपला निर्विवाद बहूमत प्राप्त झाले आहे. भाजपपाठोपाठ शिवसेना (शिंदे गट) यांनी निवडणूकीत ४२ जागांवर विजय संपादन केला. तर उबाठा ठाकरे 0२, मनसे 0१ व एक अपक्ष उमेदवार असे १११ नगरसेवक महापालिकेवर निवडून आले आहेत. महापालिकांमध्ये स्थायी समिती अध्यक्षांचे पद हे महापालिकेच्या आर्थीक व्यवस्थेत अत्यंत महत्वाचे मानले जाते. वार्षिक अंदाजपत्रक, खर्चाची मंजूरी, विकासकामांसाठी निधी वाटप, कंत्राटे आणि प्रकल्प याबाबतचे निर्णय हे महापालिकेच्या स्थायी समितीमार्फत घेतले जातात. त्यामुळेच या स्थायी समितीला महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या असे संबोधले जाते. एकंदरीत महापालिकेतील पक्षीय सदस्य बलानुसार स्थायी समितीवर भाजपचा अध्यक्ष बसणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे काल स्थायी समिती सदस्यपदासाठी निवड झालेल्या भाजपच्या सदस्यांपैकी स्थायी समिती सभापती पदावर अर्थात महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या नेमक्या कुणाच्या हाती जातात व या पदावर कुणाची वर्णी लागते याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Most Popular News of this Week
बेलापूर येथील प्रस्तावीत...
खेळाचे मैदान वाचविण्यासाठी निर्णय घेतल्याचा दावा...सखोल अभ्यासासाठी...
लॉजिस्टिक पार्क नोडमधील...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नवी मुंबई विभागाने गेल्या...
शासकीय वनजमीनीचा वन...
वाशीतील पत्रकारपरिषदेत बाळासाहेब मिरजेंचा आरोपवाशी (प्रतिनिधी) -...
कोल्हापूरचा अजिक्य रेडकर नवी...
नेरूळचा निरंत पाटील यास नमुंमपा क्षेत्र श्री सन्माननवी मुंबई (प्रतिनिधी)-...
परिवहन निवडीवरून भाजप -शिंदे...
नवी मुंबई (प्रतिनिधी) - काल झालेल्या सर्वसाधारण सभेत परिवहन समिती...
ठाणे मनपा सभागृहनेतेपदी...
महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी केली घोषणाठाणे (वार्ताहर)- ठाणे...
