Breaking News

नवी मुंबई महापालिका १० नामनिर्देशित सदस्यांची नेमणूक

नवी मुंबई महापालिका १० नामनिर्देशित सदस्यांची नेमणूक

महाराष्ट्र महापालिका अधिनियमाच्या कलम ५(२) (ब) अन्वये नवी मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेप्रसंगी काल पिठासन अधिकारी महापौर सुजाता पाटील यांनी नामनिर्देशनाव्दारे १० नामनिर्देशित सदस्यांची नेमणूक केल्याचे जाहीर केले. या १० नामनिर्देशित सदस्यांमध्ये भाजपतर्फे कुलदिप सुरी, भरत नखाते, जगजीवन केणी, अपर्णा गवते, अमित मेढकर, लक्ष्मीकांत पाटील यांच्या तर शिवसेनेतर्फे व्दारकानाथ भोईर, साहिल चौगुले, सुरेश भिलारे, अंकुश कदम यांची नेमणूक करण्यात येत असल्याचे जाहीर केले. नियुक्त नामनिर्देशित सदस्यांचे महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत व महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.



Most Popular News of this Week